२१-२-१९३९ दारूबंदीपेक्षा शिक्षणाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा - Page 295

दारूबंदीपेक्षा शिक्षणाचा प्रश्‍न अधिक महत्त्वाचा २५७

उधळपट्टी करण्याऐवजी त्याचा शिक्षणाकडे प्रथम उपयोग केला तर कितीतरी मोठे

लोकोपयोगी कार्य केले असे ठरेल. शिक्षणाचा प्रश्‍न कसा महत्त्वाचा व तातडीचा आहे हे डॉ. बाबासाहेबांनी प्राथमिक, मध्यम व कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या

विद्यार्थ्यांची आकडेवारी देऊन सिद्ध केले. या प्रांतातील शहरात १८४ प्राथमिक

शाळा व निरनिराळ्या खेडेगावात फक्त ८,५९९ शाळा आहेत आणि १२,८८५

खेडेगावात बिलकूल शाळा नाहीत. इलाख्यातील सर्व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले तर, १ कोटी ३० लक्ष रुपये खर्च होईल. यासाठी दारूबंदीसाठी खर्च

होणारी रक्कम या शिक्षणाच्या कार्याला भरपूर पुरणारी आहे. मग सरकार दारूबंदी ऐवजी या रकमेचा शिक्षणाकडे का उपयोग करीत नाही? या सरकारला शिक्षण योजनेकडे पैसे खर्च करणे इष्ट वाटत नाही काय ? आणि मी येथे ना. फडणीसांना या बाबतीत सरळ सवाल करू इच्छितो. शिक्षणाच्या प्रश्‍नाप्रमाणेच सार्वजनिक आरोग्याचाही प्रश्‍न महत्त्वाचा आहे. हल्ली सार्वजनिक

आरोग्य रक्षणाकरिता सरकार जी रक्कम खर्च करते ती इतकी अपुरी आहे की खेडोपाडी लोकांचे जीवन पिण्याच्या पाण्यावाचून कष्टमय व दुःखी झाले आहे. खेड्यापाड्यातील आपल्या गरीब बांधवांचे जीवन सुखी होण्यासाठी शहरातील लोकांवर कर बसवून त्याचा उपयोग दारूबंदी ऐवजी खेड्यातील लोकांच्या आरोग्य रक्षणाकडे का करण्यात येत नाही ? .

या प्रांताचे जमीन महसुलाचे उत्पन्न ३ कोटी १८ लक्ष ६३ हजार रुपये आहे. गेल्या वर्षी काँग्रेस सरकारने १० लक्ष रुपयांची सूट दिली होती व जमीन महसुलात ४० लक्षांची सूट देण्याचा विचार आहे. इतर कर बसवून सरकार जर सर्व जमीन महसूल अजिबात माफ करीत असेल तर आपण अंदाजपत्रकावरील विरोध खुषीने परत घेतो. (हिअर-हिअर) या देशातील मद्रास, बिहार, ओरिसा वगैरे प्रांतांचे क्षेत्रफळ वगैरेची आकडेवारी पाहिली तर मुंबई प्रांत लहान ठरेल. आपल्या प्रांतातील जमीन सर्वत्र ठिकाणी लागवडीस लागलेली आहे. अशा परिस्थितीत शेतीपेक्षा उद्योगधंद्यांची वाढ झपाट्याने होणे

अत्यावश्यक आहे.

चरख्यासारख्या प्रश्‍नाला महत्त्व देऊन, बाजारात चढाओढीत न टिकणारी खादी ग्रामोद्धाराचा प्रश्‍न सुलभतेने सोडवू शकत नाही. या सर्व गोष्टींचा बारकाईने विचार केल्यानंतर या देशातील औद्योगिकरणाला विरोध करणारा मनुष्य देशाचा वरून मित्र असला तरी खरा शत्रु आहे असेच म्हणेन, तसेच

ही (वाय) ४१०-१९