| १५४
| ____ जिल्हावारी चळवळीमुळे संघटनशक्ती | | कमकुवत बनेल
|| चेंबूर, मुंबई येथील अस्पृश्य समाज संघटन या संस्थेच्या विद्यमाने ता. २६
फेब्रुवारी १९३९ रोजी चेंबूर येथे सायं. स्वतंत्र मजूर पक्षाचे सेक्रेटरी भाई डी
व्ही. प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली सभा भरविण्यात आली होती. यावेळी स्वतंत्र | मजूर पक्षाचे मुंबई प्रांतिक असेंब्लीचे आमदार, मुंबई म्युनिसीपालिटीमध्ये निवडून
$ आलेले प्रतिनिधी याशिवाय विविध वृत्ताचे संपादक, रामभाऊ तटणीस हजर
॥ होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टाळ्यांच्या कडकडाटात बोलावयास उठले
प्रथम त्यांनी चेंबूर येथील कामगारांनी मोठ्या प्रेमाने, आस्थेने, इमारत | फंडाकरिता पैसे जमविल्याबद्दल त्यांचे हार्दीक अभिनंदन केले. नंतर ते पुढे
म्हणाले
या इमारत फंडाचे महत्त्व किती आहे, हे माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी
सांगितलेले आहे. या फंडाकरिता निदान दोन लाखांचा तरी निधी जमविणे
| आवश्यक आहे. आतापर्यंत यासाठी जमा झालेली रक्कम पासंगालाही पुरणार
| नाही. या फंडाची मला कल्पना जेव्हा सुचली तेव्हा शेवटच्या बाजीरावाच्या
| दानशूरपणाची मला प्रथम आठवण झाली. त्याने एका भिक्षुकाला त्याचे
| समाधान होईपर्यंत त्याच्या डोक्यावर रुपये ओतून केलेल्या दानधर्माची गोष्ट
वाचून मीही मला कुणी या फंडाकरिता असे दान द्यावयास तयार असल्यास तितके
| कष्ट सोसून माझ्या डोक्यावर रुपये ओतून घेत राहीन. भिक्षुकवृत्ती
स्वीकारल्याशिवाय या इमारत फंडाची पूर्तता लवकर होणार नाही. नंतर त्यांनी $ चेंबूर येथील अस्पृश्य कामगारांच्या १९२६ ते १९३९ पर्यंतच्या काळातील जीवनाचे
| भयानक दृश्य निवेदन केले. पूर्वीची घाणेरडी वस्ती व त्यामध्ये माणसे व
[कचरा यांच्यामध्ये कधीच भेदभाव दिसत नव्हता. त्यामानाने आज दहा वर्षात | बरेच समाधानकारक असे स्थित्यंतर घडून आलेले आहे. आज शिक्षण
| सुधारणा वगैरे बादींमुळे आपल्या समाजात झालेली सुधारणा अभिनंदनीय
जनता : ४ मार्च १९३९.
[वि (वाय) ४१०-१९ अ