आणि माषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन २६०
झटणे आवश्यक आहे. मुलांना आजच्यापेक्षा अधिक शिक्षण मिळवून देण्यासाठी
कामगारांचा संघ आहे. १० वर्षापूर्वी तुमची स्थिती सुधारण्यासाठी
नव्हता. म्युनिसीपालिटीमध्ये आपले स्वतःचे प्रतिनिधी नव्हते. परंतु गेल्याच निवडणुकीत म्युनिसीपालिटीमध्ये आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाचे पाच सहा प्रतिनिधी निवडून आलेले आहेत. या निवडणुकीसाठी मी श्री. गणपतबुवा जाधव यांना उभे केले होते. दुर्दैवाने ते निवडून आले नाहीत. परंतु माझी खात्री | आहे की त्यांनी आपल्या कामगार बांधवांसाठी अपूर्व अशी कामगिरी केली असती. केवळ आपल्याच काही मंडळीच्या विश्वासघाताने त्यांना अपयश आले आहे. ही गोष्टही मी कधीच विसरणार नाही. श्री. गणपतबुवा यांना गेल्या
निवडणुकीत झालेल्या खर्चाबद्दल येथील कामगारांनी त्यांच्या आजपर्यंतच्या कामगिरीची जाणीव ओळखून त्यांना शंभर रुपये मदत म्हणून देण्याचे कबूल केले आहे. याबद्दल मी या सर्व मंडळींचे आभार मानतो.
आपली चळवळ संघटित करण्यासाठी जिल्हावार चळवळ सुरू आहे ती बंद
केली पाहिजे. अशा जिल्हावार भावनेने कार्य केल्यामुळे संघटनशक्ती
कमकुवत बनते. एकमेकांच्या चढाओढीच्या कार्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यात हेवा, मत्सर वगैरे उत्पन्न होण्याची भिती अधिक असते. आपण सर्वांनी एक होवून आपला स्वतंत्र मजूर पक्षाचा लढा यशस्वी करा. जिल्ह्याजिल्ह्याच्या भावना
सोडून द्या. हाच माझा तुम्हाला खरा संदेश आहे.
यानंतर श्री. डी. व्ही. प्रधान यांचे वेळेच्या अभावी थोडेसे भाषण झाल्यावर सर्व
पाहुणे मंडळीना हारतुरे अर्पण करण्यांत आले. या सभेची सर्व उत्तम
व्यवस्था जी. ओ. सी. श्री. धयाळकर यांच्या नेतृत्वाखाली समता सैनिक दलाने
ठेविली होती.