२१-३-१९३९ साम्राज्यशाही, भांडवलशाही, जामीनदार- शाही आणि मध्यमवर्गीय हिदी व्यापारी यांच्या दडपणातून राष्ट्राला मुक्त करणे हे संपूर्ण स्वातंत्र्य - Page 301

सर्व राजकीय पक्षांनी एक होऊन . . . . धुरा आपल्या हाती घ्यावी २६३

तुरुंगवासाबरोबर करणे अशक्य आहे. त्यांच्या तुरुंगवासाच्या भयाण देखाव्याने डोळ्यातून अश्रू प्रवाहाऐवजी रक्ताचे थेंबसुद्धा गळू लागले असते. काँग्रेसची सत्ता म्हणजे एक झोटिंगशाहीचा कारभार आणि या कारभाराला खरे पाहिले असता मतदारसंघच कारणीभूत आहे. : त्याने आता काँग्रेसच्या राजकीय खेळखंडोब्याला दूषणे देण्यात काय अर्थ आहे? याला एकच उपाय आहे आणि तो म्हटला म्हणजे काँग्रेसची ही ढोंगी बुवाबाजी [नाहिशी ] [करण्यासाठी ] सर्व राजकीय पक्षांनी एक होऊन संघटना केली पाहिजे आणि [कोणत्याही ] संकटांना न भिता हिंदी राजकारणाची [धुरा ] [आपल्या ] [हाती ] [घेण्याचा ] [प्रयत्न ] [केला ] पाहिजे. आपण आजच्या मुंबई असेब्लीमधील [काँग्रेस ] [सभासदांकडे ] [चिकित्सक ] दृष्टीने पाहा. ते असेंब्लीमधील दृश्य पाहिले की, [हा ] [किंग ] [एडवर्ड ] [हॉस्पिटलमधील ] लुळे पांगळे, आंधळे, म्हातारे वगैरे [रोग्यांचा ] [राखीव ] [वार्ड ] [आहे ] [की ] [काय ] [असा ]

भास होतो.