डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३१०
परिषदेवर अधिकाऱ्यांची कोल्हापूरचे राज्य मराठ्यांचे असूनही आजच्या
' मुडदा अवकृपा झालेली आहे. मी रयत सभेचे अध्यक्षस्थान स्वीकारावे म्हणून
माझा जागवतात ' त्याप्रमाणे माझ्या आसपास असणाऱ्या अधिकाऱ्यांना आज विसर पडला आहे. यावरून काय समजावयाचे ते समजा. आजच्या सभेला म्युनिसीपालिटीमे १०० व दरबारने १०० रु. दिले. याव्यतिरिक्त मदत परिषदेस मिळालेली नाही. या सभेस स्वयंस्फूर्तिने लोक जमा झालेले आहेत. जुलूम जबरदस्तीने गावपाटलाकडून मारुन मुटकून आणलेले लोक या परिषदेत नाहीत. या सभेसाठी हजारो रुपयांचा चुराडा झाला नाही हे या सभेचे वैगुण्य. मग ती अधिकाऱ्यांना कशी आवडणार ?
कोल्हापुरात मला एक विशेष गोष्ट आढळून आली आहे. अनुयायांपेक्षा पुढाऱ्यांची संख्याच येथे फार माजली आहे. या राज्याची पद्धत अशी आहे की
येथील कोणत्याही फाटक्या तुटक्या माणसास अधिकाऱ्यांच्या कानाशी लागता
येते. मी आजच्या सभेला अध्यक्ष नको, असा अर्जही दिवाणाकडे गेल्याचे माझ्या कानी आले आहे. अशा परिस्थितीत दलित प्रजामंडळ चिरकाळ टिकेल अशी व्यवस्था करण्याचे काम तुमचे आहे. एक ना धड भाराभर चिंध्या असा प्रकार
इतःपर तुम्ही करू नका. आजच्या परिषदेस महाराजांना मानपत्र देण्याचा आपला मानस होता. ती गोष्ट शक्य झाली नाही म्हणून आपण दिलगीर आहोत. महाराजांनी आजच्या परिषदेचा मेळा पाहिला एवढ्यानेच आपण कृतार्थ
झालो आहोत. आपण महाराजांशी राजनिष्ठ राहावे. महाराजांनीही पड
जमिनी, देवस्थानाच्या जमिनी व शेरी जमीनी अस्पृश्यांना कसण्यास देऊन त्यांना
उद्योगधंद्यास लावावे, असे मला वाटते. अस्पृश्यांच्या शिक्षणाप्रित्यर्थ जादा
पैसा पुरविणे हे संस्थानाचे कर्तव्य आहे. अस्पृश्य मुलींच्या वसतिगृहासाठीही सढळ हाताने पैसा खर्च केल्यास त्याने अस्पृश्य समाजाचे कल्याण झाल्याशिवाय
राहणार नाही. शेवटी दलित प्रजामंडळाची संघटना मजबूत करा, असे माझे
तुम्हाला आग्रहाचे सांगणे आहे.