शाहू छत्रपतींनी ब्राह्मण्याचा किल्ला ढासळून टाकला ३०९
विद्यार्थी वसतिगृहासाठी कोल्हापूर संस्थानात रू. ३९,३२१ खर्च होत
| असतात, ही गोष्ट वरील आकड्यांवरून सिद्ध होते. पण या रकमेतील अवघे
रू. १,३२५ च फक्त अस्पृश्यांच्या नं. ७ व ८ या वसतिगृहांच्या वाट्याला येतात
ही लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे.
। याशिवाय या संस्थानात २० अस्पृश्य विद्यार्थ्यांनाच काय ती अर्धी फी माफ
| करण्यात येत असते. वरील विवेचनावरून अस्पृश्यांच्या शिक्षणाची हेळसांडच
! या संस्थानात होत आहे हे उघड आहे.
[
| आता आपण शेतीच्या प्रश्नाकडे वळू. या संस्थानात एकंदर शेतीजमीन
| बावीस लाख एकर असून त्यापैकी वहिवाटली जाणारी जमीन तेरा लाख, तेरा
। हजार एकर आहे. पड जमीन ३,७१,४२३ एकर असून महाराजांची खाजगी शेरी
` जमीन ४६,३५९ एकर आहे. ही पड व शेरी जमीन अस्पृश्यांना देऊन त्यांची
: स्थिती सुधारणे शक्य नाही काय ? देवस्थान व धर्मदाय खातीही संस्थानाचा
बराच पैसा निरर्थक खर्चत असतो, हे सांगणे नकोच.
कोल्हापूर येथील इलाखा पंचायत व म्युनिसीपालिटी या संस्थात अस्पृश्यांचे
` प्रतिनिधी नाहीतच, असे म्हणावयास हरकत नाही. या नवयुगात एक गोष्ट
` सर्वमान्य झालेली आहे. प्रातिनिधीक संस्थांतून भिन्न लोकांचे लोकसंख्येच्या
` प्रमाणात प्रतिनिधी घेणे ही ती गोष्ट होय. आता येथील परिस्थिती काय आहे
ती पहा. इलाखा पंचायतीत २८ सभासद असून त्यात एकही अस्पृश्य ' नाही. म्युनिसीपालिटीत अस्पृश्यांचे फक्त दोनच प्रतिनिधी घेण्यात आलेले
आहेत आता नवे कायदेमंडळ अस्तित्वात येणार आहे. त्यात तरी आमच्या
हक्कांची आजवर झाली तशी पायमल्ली होणार नाही, अशी आपण आशा करू
या. कोल्हापूर संस्थानाबद्दल मला भारी आशा होती. पण या संस्थानानेही
माझी सर्वस्वी निराशाच केली आहे. छत्रपतींच्या राज्यात आम्हा अस्पृश्यांच्या
हिताची अव्याहत वाढ होत जाणार, अशी मला फार आशा होती. पण ती झाली ` नाही, ही फार खेदाची गोष्ट होय.
शेवटी मला महाराजांना दोन गोष्टी सांगावयाच्या आहेत. एकतर त्यांनी
स्वतःच्या हातात राज्यसूत्रे घेऊन कारभार पाहावा नाहीतर प्रजेला अधिकार
देऊन लोकशाही तरी स्थापन करावी. प्रजेला नोकरशाहीच्या ताब्यात मात्र
मुळीच ठेवू नये. लोकशाही हमेशा कल्याणप्रद होतेच असे नाही. ही गोष्ट
तुर्कस्तान, इटली व जर्मनीच्या चालू इतिहासातील एकसूत्री राज्यपद्धतीने सिद्ध
केली आहे.