३१२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
खाण्यातही येतात, ही गोष्ट मला माहीत आहे. तरी एवढ्यासाठी समाजकार्य थांबविता येणार नाही. तळे राखणारा पाणी चाखतो, त्याचा आपण बंदोबस्त केला पाहिजे. पण आपण थाबाबतीत व्यावहारिक दृष्टी ठेवली पाहिजे. काँग्रेसच्या एक कोटी फंडाची काय अवस्था झाली, हे जगजाहीर असून काँग्रेसचे कार्य चालूच आहे. आपसातील बारीकसारीक गोष्टींना महत्त्व देऊन यापुढे समाजात भेद करू नका, असेच माझे तुम्हास शेवटी सांगणे आहे.