३१-१२-१९३९ माझ्यामागे तुमचे ऐक्य अभेद्य ठेवा - Page 351

१७०
युद्धोत्तर हिंदुस्थानपुढे [मोठमोठे ] [प्रश्‍न ]
उपस्थित होणार आहेत

ता. २ जानेवारी १९४० रोजी संध्याकाळी ४ वाजता कऱ्हाड म्युनिसीपालिटीने

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानपत्र देण्याचे ठरविले होते. या समारंभासाठी

डॉ. बाबासाहेब सातारहून सुमारे ३ वाजता जाण्यास निघाले. सातारहून १३ | मैलांच्या अंतरावर गाडी नादुरुस्त होऊन पुढे जाणे अशक्य झाले. थोड्यावेळात

मुंबई येथील परळ भागातील तंबाखूचे प्रसिद्ध व्यापारी रा. लक्ष्मणराव शेटे हे ` आपल्या खाजगी मोटारीतून जात असता त्या ठिकाणी येऊन पोहोचले. त्यांनी डॉ. आंबेडकर यांना कन्हाडपर्यत नेण्याचे मोठ्या आनंदाने कबूल केले. याच ` गाडीस कऱ्हाडजवळ एक भयंकर अपघात झाला. सुदैवाने गाडीतील उतारु

मरणाच्या दारातून वाचले. कोणासही गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या

नाहीत. डॉ. आंबेडकरांच्या डोक्यास, पायास व हातास मार बसला

होता. गाडीतील मार लागलेल्या सर्व जणास सातारचे बॅरिस्टर करंदीकर यांनी

सरकारी दवाखान्यात नेले व त्यांना पट्ट्या बांधण्यात आल्या. दवाखान्यात थोडी

विश्रांती घेतल्यानंतर डॉ. आंबेडकर सुमारे ६ च्या सुमारास म्युनिसीपालिटीतील

मानपत्र समारंभास जाण्यास निघाले. म्युनिसीपालिटीचा हॉल आतून व

बाहेरून सभासदांनी व इतर नागरिकांनी फुलून गेला होता. प्रथमतः स्थानिक

स्पृश्य विद्यार्थिनींनी स्वागतपर पद्ये म्हटली व समारंभास सुरुवात करण्यात

आली. पच्ये म्हणून झाल्यावर रा. बहुलेकर वकील यांनी म्युनिसीपालिटीचे

मानपत्र वाचून दाखविले. म्युनिसीपालिटीचे अध्यक्ष रा. कदम यांनी हे मानपत्र

डॉ. बाबासाहेबांस अर्पण केले. मानपत्र अर्पण झाल्यावर डॉक्टरसाहेब उत्तर

देण्यासाठी उभे राहिले. ते आपल्या भाषणात म्हणाले, |

अध्यक्ष महाराज, सभासद, भगिनी व बंधुजनहो,

आपण मला जे मानपत्र दिले आहे त्याबद्दल मी आपला फार आभारी आहे.

स्थानिक प्रश्‍नाबाबत मी काही कामगिरी केलेली नाही. मी कऱ्हाडचा

रहिवाशीही नाही. माझी कामगिरी राजकीय स्वरूपाची आहे. अशा

परिस्थितीत आपण मला मानपत्र अर्पण करून माझा जो गौरव केला आहे त्यावरून

आपला उदारपणा मात्र व्यक्त होतो. आज या समारंभास मला हजर राहता

आले ही इष्टापत्तीच होय.

जनता : २० जानेवारी १९४०.