व्यवहारज्ञान व शील हे . . . . असे माझे मत आहे ३३९
मी विलायतेत असताना आम्ही हिंदी विद्यार्थी दर रविवारी एका होस्टेलमध्ये
व्याख्यान ऐकण्यास जमत असू. तेथे मला एक विचित्र गोष्ट दिसून
आली. आमची महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांची संख्या कमी होती. आम्ही सात, आठ
विद्यार्थीच होतो व आम्ही एका बाजूला बसून व्याख्यान ऐकत असू व्याख्यानानंतर,
व्याख्यात्यास प्रश्न विचारण्यात येत असत व व्याख्यात्याच्या उत्तराने प्रश्न
विचारणारांची चांगलीच शोभा होत असे. चार पाच वर्षांच्या अवधीत एकाही
महाराष्ट्रीय विद्यार्थ्याने एखादा प्रश्न विचारुन आपली शोभा करून घेतल्याचे मला
स्मरत नाही.
या महाराष्ट्रीयांच्या धोरणावरूनच त्यांचे व्यवहार ज्ञान उत्तम रीतीने व्यक्त
होत नाही काय? |
दुसरी एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे. हिंदी चळवळींविरुद्ध विलायतेत पाळत ठेवण्यासाठी हिंदी सी.आय.डी. नेमण्यात येत असत. इतर प्रांतातील
विद्यार्थी हे काम करताना आढळून येत. पण मला सांगावयास अभिमान वाटतो
की, त्यामध्ये एकही महाराष्ट्रीय कधी आढळून आला नाही. |
म्हणून व्यवहारज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे दोन गुण होत असे माझे मत आहे. या गुणांमुळेच महाराष्ट्राला हिंदुस्थानात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
|
|
| | सध्या हिंदुस्थानात काल्पनिक (113४119197) राजकारण धुमाकूळ घालीत आहे. अशा परिस्थितीत व्यवहार व शील यांची सांगड घालून महाराष्ट्राने आपले कर्तव्य बजावले पाहिजे. आजचे राजकारण अगदीच उडाणटप्पू व अल्लडटप्पू बनले आहे. या दुर्धर प्रसंगातून हिंदुस्थानची सोडवणूक करावयास हवी आहे. हल्लीची परिस्थिती अत्यंत धोक्याची झाली आहे. आपण जागरुकता राखली तरच तरणोपाय आहे. आपण महाराष्ट्रीयांनी तरी अंधश्रद्धा ठेवून कोणाच्या तरी मागे जाणे हे आपल्या शीलास, व्यवहारास व ज्ञानास शोभण्यासारखे खास नाही.
मानपत्राबद्दल पुनः आपले आभार मानून मी आपले भाषण संपवितो.