१९-३-१९४० व्यवहार ज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे दोन गुण होत, असे माझे मत आहे - Page 376

डॉ. वाबासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे 3३८

मोठ्या आशेने पाहात आणि श्रमजिवी वर्ग आपल्याकडे ह्या देशातील दलित

सफल होवोत व त्यासाठी आपल्याला आहे. त्यांच्या आशा आपल्या हातून

जगन्नियंत्या प्रभुच्या चरणी प्रार्थना करून आम्ही दीर्घायुरारोग्य प्राप्त होवो अशी

हे मानपत्र आदराने आणि आपुलकीच्या भावनेने आपल्याला अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार व्हावा अशी आमची विनंती आहे.

आपले नम्र सेवक,

विष्णु नरहरी खोडके,

प्रेसिडेंट,

महाड म्युनिसीपालिटी.

मानपत्र वाचून दाखविल्यावर डॉ. आंबेडकरांनी उत्तरादाखल छोटेसे भाषण

केले. ते आपल्या भाषणात म्हणाले,

अध्यक्ष महाराज, सभासद व नागरिक जनहो,

आपण मला दिलेल्या मानपत्राबद्दल मी आपला फार आभारी आहे. मला आपण मानपत्र दिले नसते तरी मी आपला ऋणी राहिलो असतोच. माझ्या सार्वजनिक कार्याचा उगम महाडात झाला. त्या कार्यास लागणाऱ्या स्फूर्तीचा पुरवठाही मला येथूनच मिळाला आहे व याच शहरातून मला सहकाऱ्यांचा लाभही

झाला आहे.

चौदा वर्षांपूर्वी आमच्या चळवळीने महाडात जो दंगा झाला त्यामुळे काही स्थानिक लोकांचा आम्हास विरोध होणे हे स्वाभाविकच आहे. आज आपण उदारपणे या तंट्यास कारणीभूत होणाऱ्या आम्हास सन्मानाने वागवीत आहा

हे पाहून मला आनंद होत आहे. महाडच्या सहकाऱ्यांची माझ्या कार्यास बहुमोल मदत होत असते, यामुळेही मला महाडकरांबद्दल अभिमान वाटत

असतो. वरून जातिवाचक भासणारे माझे कार्य अंतर्यामी खरे राष्ट्रीय स्वरुपाचे आहे हे आपण ओळखले आहे. यावरून आपला चाणाक्षपणा चांगला व्यक्त

. होत आहे.

माझा नेहमीचा रवंथ करण्याचा विषय राजकारण हाच होय हे आपणास माहीत असणारच. राजकारणासंबंधी बोललो नाही की मला चुकल्या चुकल्यासारखे वाटू लागते. मी आपल्या आयुष्याच्या पूर्व वयात सात आठ वर्षे विलायतेत काढली आहेत. विलायतेतच हिंदुस्थानातील निरनिराळया प्रांतातील लोक एकत्र पाहावयास मिळतात व त्यांच्याशी मैत्रीही करता येते. मला विलायतेत असतानाच महाराष्ट्रीय व इतर प्रांतातील लोक त्यांच्या स्वभावात काय गुण दोष आहेत ते ताडून पाहावयास मिळाले. बंगाल व मद्रास प्रांतातील लोकांपेक्षा महाराष्ट्रीय बुद्धीने थोडे फार कमी असतील कदाचित पण महाराष्ट्रीयात जे व्यवहारज्ञान (Common ७९१५९) ओतप्रोत भरलेले आढळून येते तसे इतर समाजात येत नाही.