१९-३-१९४० व्यवहार ज्ञान व शील हे महाराष्ट्रीयांचे दोन गुण होत, असे माझे मत आहे - Page 379

१७७

निश्चयाने निश्चयाने, कर्‌ निष्ठेने आणि निमूटपणे

कार्य करणारे कार्यकर्ते हवेत

रविवार ता. २८ जुले १९४० रोजी सकाळी १० वाजता दामोदर ठाकरसी हॉल, परळ, मुंबई येथे ठाणे अस्पृश्य [विद्यार्थी ] [वसतिगृह ] [सहाय्यक ] [मंडळाच्या ] विद्यमाने अस्पृश्य समाजाची जंगी जाहीर सभा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती.

प्रथम श्री. पी. एल. लोखंडे यांनी प्रि. एम. व्ही. दोंदे, बी. ए. आणि

श्री. एस. जी. केनी, जे.पी. यांच्या अभिनंदनाचा [ठराव ] [मांडला. ] त्यानंतर श्री. लोखंडे, श्री. ए. बी. केनी, श्री. सी. एन. मोहिते आणि [वि. ] [का. ] [उपशाम ] [यांची ]

भाषणे झाली. यानंतर डॉ. बाबासाहेब आपल्या भाषणात म्हणाले,

आजच्या प्रसंगी विशेष भाषण करण्याची जरुरी नाही. ठाणे बोर्डिंग १९२६ साली काढण्यात आले. आज १४-१५ वर्षे समाजावर कोणत्याही प्रकारचा भार न टाकता ते चालविले. ह्या बोर्डिगच्या बाबत मुंबई सरकारशी मी काही अटी ठरविल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येक मुलामागे दरमहा १० रुपये देण्याचे ठरले होते. पण काँग्रेस सरकार अस्तित्वात आल्यावर त्यांनी माझ्याशी वाटाघाटी न करता मुलामागे १० रुपयांऐवजी ४ रुपयेच मंजूर केले. प्रत्येक मुलाचा खर्च ४ रुपयात भागवून बोर्डिंग चालविणे अतिशय कठिण काम आहे.

आता ठाणे बोडिंगची सारी जबाबदारी तुमच्यावर आहे. हिंदुंच्या दारी जाणे स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे. आपण स्वतःच्या शिरावर जबाबदारी घेऊन बोडिंग अव्याहत चालविले पाहिजे. बोर्डिंग सतत चालविण्याच्या दृष्टीने आज मिळालेली मदत अपुरी आहे. कार्यकर्त्यांना काम करण्यास उत्साह येइल, अशी मदत करा, ती मदत कशी करावयाची ते तुम्ही ठरवा. पण मला वाटते आपल्यात सुशिक्षित शिक्षक, कारकून इत्यादी मंडळी प्रामुख्याने दिसत आहे. त्यांना दरमहा बोर्डिगला मदत करणे शक्य आहे. म्युनिसीपल युनियनच्या कार्यकर्त्यांनी युनियनच्या सभासदांकडून वर्षाच्या काठी काही मदत मिळवून द्यावी. लग्नादी विधी होतात त्यावेळी बोर्डिगला मदत करावी: 1041 444 य त स ययात

जनता : 3 ऑगस्ट १९४०.