१४-७-१९४० स्वतंत्र मजूर पक्षाच्या आश्रयाने चाल- विणाऱ्या वृक्षाचे छापखाना व 'जनता' पत्र हे मूळ आहे - Page 380

आणि भाषणे डॉ. बावासाहेब आंवेडकर लेखन ३४२

दिल्यास काही समाजात १०० च्या वर संस्था आहेत. त्यांनी वर्षअखेर २०-२५ रु.

पैशाच्या अभावी बंद पडणार वावगे होणार नाही. पण मला वाटते बोर्डिंग नाही. आपल्या समाजात एकाग्र चित्ताने काम करणारा एकही मुनष्य आज वीस वर्षात मला दिसला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसीपालिटीच्या एका जागेकरिता १०० अर्ज तयार असतात. पण एकच काम एका मार्गाने, एकाच ध्येयाने करणारा एकही मनुष्य अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्‍न महत्त्वाचे आहेत. ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत. जो तो प्रसिद्धीच्या मागे आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्‍न सुटत नाहीत. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. ब्राह्मण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की, त्यांनी मिळविलेली सत्ता ते कायम टिकवून धरू शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते

त्यांच्यात निपजतात. आपल्या कार्यकर्त्या मंडळींनी अजून निश्चयान, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करावयास सुरवात केल्यास आपली चळवळ पसरल्याशिवाय-

राहाणार नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाच्या वेळी देणग्यांचा वर्षाव सारखा सुरू

होता. सभेत एकूण रुपये १८२ जमले. श्री. जी. एम. जाधव यांनी एका वर्षात

७०० पायली तांदूळ ' म्युनिसीपल कामगार संघाच्या ' सभासदांकडून मिळवून

देण्याचे अभिवचन दिले.

श्री. के. व्ही. सवादकर मॅनेजर ' जनता ' यांनी जनता पत्र व भारतभूषण

छापखाना या संस्थेस मदत करणाऱ्या सद्गृहस्थांचे अंतःकरणपूर्वक आभार मानीले. श्री. रामकृष्ण गंगाराम उफ बाबूराव भातणकर, एम. एल. ए., चेअरमन _

' ठाणे वसतिगृह सहाय्यक मंडळ ' यांनी ठाणे बोर्डिंगला मदत करणाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानीले आणि बाबासाहेबांच्या भाषणाचा विचार करून प्रत्येकाने

त्यांच्या आज्ञेनुसार वागण्याचा निश्चय करावा अशी जनसमुहास विनंती केली आणि सर्वाचे आभार मानल्यावर सभा बरखास्त झाली.