२९-९-१९४० दूरदृष्टी आणि काटकसर हे वैभव भावी पिढीने टिकविले पाहिजे - Page 385

१८१

`` `` तर खेड्यापाड्यातील

अन्यायग्रस्त लोकांना [मदत ] [करता ] [येईल ]

दिनांक १ नोव्हेंबर १९४० रोजी इमारत व तिच्याकरिता जमवावयाचा फड या विषयीची योजना यासंबंधी जंगी सभा चित्रा सिनेमाच्या पाठीमागे घेतलेल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरविण्यात आली होती. सभेत श्री. डी. व्ही. प्रधान, भा. र. कद्रेकर, के. व्ही. चित्रे वगैरे प्रमुख मंडळी हजर होती. डॉ. साहेबांचे स्वागत जमलेल्या समुदायाने टाळ्यांच्या कडकडाटात केले.

सभेस सुरवात श्री. बी. एस. गायकवाड यांनी केली. त्यांनी अध्यक्षांची सूचना आणताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्येष्ठ भावजई श्रीमती लक्ष्मीबाई ह्या बुधवार, तारीख २३-१०-४० रोजी पहाटे २-३० वाजता स्वर्गवासी झाल्माचे वर्तमान उपस्थित असलेल्या लोकांना सांगितले आणि अशा तऱ्हेचे वैयक्तिक संकट आले

असताही डॉ. बाबासाहेबांनी स्वतःचे व आपले दुःख बाजूला ठेवून सभेचे

अध्यक्षस्थान स्वीकारण्याचे कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार मानिले. तसेच

चिटणीस इमारत फंड यांच्या विनंतीस मान देऊन मोठ्या जमावाने उपस्थित

झाल्याबद्दल चिटणीसाचे वतीने जनतेचेही आभार मानले. नंतर डॉ. बाबासाहेबांना

अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. श्री. एस. एल. वडवलकर यांनी

अनुमोदन दिल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रचंड टाळ्यांच्या कडकडाटात

बोलावयास उभे राहिले, ते म्हणाले,

आजची सभा घेण्याची वास्तविक जरूरी नव्हती. कारण इमारत व

तिच्यासाठी फंड उभा करणे या विषयीची घोषणा मी दोन वर्षापूर्वी केलेली

होती. तेव्हापासून एखादी सोईची जागा आम्ही मिळविण्याच्या प्रयत्नात

होतो. मुंबई शहरात बहुधा दोन प्रकारच्या जागा आहेत. एक मुंबई

म्युनिसीपालिटीच्या जागा व दोन इम्प्रुव्हमेंट ट्रस्टच्या जाया. इम्प्रुव्हमेंट ट्रस्टची

जागा विकत घेणाराने त्या जागेच्या फक्त एक तृतीयांश जागेवर इमारत

बांधावयाची व बाकीची दोन तृतीयांश जागा तिच्या भोवती रिकामी सोडावयाची,

असा नियम आहे. तसेच म्युनिसीपालिटीची जागा विकत घेणारास १० फूट

जागा चोहोकडे मोकळी सोडावी लागते. या जबरदस्त अटी आम्हास मान्य

ल YO

जनता : १६ नोव्हेंबर १९४०.