१०-१०-१९४० अस्पृश्यांच्याच पैशावर चळवळीसाठी भव्य इमारत उभारा - Page 386

डॉ. वावासाहेव आंवेडकर लेखन आणि भाषणे ३४८

होण्यासारख्या नव्हत्या. म्हणून आम्ही दुसरी एखादी सोईची जागा

लागलो. शेवटी ज्या जागेवर आपण आता बसला आहात [ती ] [जागा ] [आम्ही ] पसं

केली. ही विस्तीर्ण जागा तोडून द्यावयास जागेचा मालक [तयार ] [नव्हता. ]

काही मित्रांच्या मदतीने ही जागा आम्ही [तोडून ] [घेतली. ]

२० वर्षेपर्यंत आपला सामाजिक कारभार चालला असताना सभा, समारं

वगैरे निरनिराळ्या कार्यांकरिता जागेसाठी आपणास इतरांकडे जाणे

होते. ही उणीव या जागेवरील इमारतीने खास भरून निघेल. ही

आपणा सर्वास फारच सोईची आहे. ह्या जागेचे क्षेत्रफळ १,१०० चौरस वार

आहे. बाजूला ट्रॅम आहे. जी. आय. पी; बी. बी. अन्ड सी. आय. ची स्टेशनेहुँ जवळ आहेत. किंमतीच्या दृष्टीने पाहता ही जागा आपणास सवलतीने मिळाली,

असे म्हणावयास काहीच हरकत नाही. काही ठिकाणी जागेची किंमत २२ रुपये वार तर दुसरीकडे तिची किंमत २५, २७, ३० रुपये वार अशी आहे. ही जागा आपणास १५ रुपये वार पडली आहे. (टाळ्या).

आनंदाची गोष्ट ही की जागेच्या मालकाची आजच्या आज जागेची सर्व रक्‍कम द्या व मग तिचा ताबा घ्या, अशी अट नाही. तसे झाले असते तर इतकी मोठी १५-१६ हजार रुपयांची रक्‍कम देणे आपणास कठीण झाले असते. आपणास बारा वर्षात ही रककम हप्त्याहप्त्याने द्यावयाची आहे.

ही जागा आम्ही ९९९ वर्षाच्या कराराने घेतली आहे. व्यावहारिक दृष्टीने हा करार म्हणजे यावच्चंद्रदिवाकरौ मालकी असावयाचा करार आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

या जागेवर तीन मजली इमारत बांधण्याचा आमचा इरादा आहे. पहिल्या मजल्यावर अर्ध्या भागात ' भारत भूषण छापखाना ' व अर्ध्या भागात म्युनिसीपल युनियनची व इतर ऑफिसे व काही राहण्याच्या खोल्या ठेवण्याची व्यवस्था करावयाची आहे. दुसरा मजला भाडोत्री लोकांकरिता तयार करावयाचा आहे. त्यात सुमारे सोळा खोल्या तयार . होतील, असा अंदाज आहेव त्याचे जवळ जवळ वर्षाचे ३,५०० रुपये भाडे येण्याचा संभव आहे.

तिसऱ्या मजल्यावर ५० फूट रुंद व १०० फूट लांब असा हॉल बांधावयाचा आहे.

हॉलचे भाडे नियमित यायचे नाही. तरीपण वर्षाचे ४००-५०० रुपये भाडे येईल, असा अंदाज आहे.