| ९७
या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत
अस्पृश्यांचे एकमेव पुढारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विलायतेहून आगमन
। होताच त्यांनी आपल्या स्वतंत्र मजूर पक्षाच्या दौर्याचा कार्यक्रम आखला. पहिल्या
फेरीत त्यांनी नाशिक जिल्ह्यातून दौरा काढण्याचे ठरविले. सभा वगैरे घेण्यास
अवधी थोडा होता. तरीपण नाशिकचे कर्तबगार आणि धीरवंत पुढारी भाऊराव
। गायकवाड यांनी डॉ. बाबासाहेबांच्या दौ-याचा कार्यक्रम इतक्या कुशलतेने आखला ; की, हजारो स्त्री-पुरुष व मुले निरनिराळ्या ठिकाणी, रस्त्यात, चावडीत, गावच्या
| वेशीवर डॉ. बाबासाहेबांच्या दर्शनासाठी उत्सुकतेने वाट पहात होते.
प्रथम शनिवार ता. १६ जानेवारी १९३७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे
` नागपूर मेलने इगतपुरीस रात्रौ ८ वाजता आले असता इगतपुरीकर मंडळीतर्फे व
स्वावलंबन मंडळातर्फे स्टेशनवर पुष्पहार अर्पण करण्यात येऊन रात्रौ ९ वाजता
` पोस्टाचे शेजारच्या पटांगणात जाहीर सभा भरली. सभेस सुमारे दोन हजारांवर
जनसमूह हजर होता. दुसरे दिवशी ता. १७-१-३७ रविवार रोजी पॅसेंजर ट्रेनने
सकाळी सव्वा सात वाजता कॅप देवळालीस येत असता इगतपुरी स्टेशनवर
` पुष्पहार अर्पण करण्यात येऊन "डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय" च्या जयघोषात
' इगतपुरी सोडली. डॉ. बाबासाहेबांसमवेत नाशिकचे उमेदवार श्रीयुत भाऊराव
' कृष्णराव गायकवाड, पूर्व खानदेशचे उमेदवार श्री. दौलतराव जाधव व नगरचे
` उमेदवार श्री. प्रभाकर जनार्दन रोहम, नाशिक जिल्हा युवक संघाच्या जलशा
` मंडळापैकी देवराव डांगळे, भीमराव कर्डक, बाळाजी वगैरे मंडळी होती.
` नाशिकरोडवरील व इगतपुरी येथील स्काऊट मंडळाने शांतता व सुव्यवस्था ठेवण्याचे काम उत्तम तऱहेने केले. पुढे वाटेत घोटी, आसवली, लहवीत या
' स्टेशनांवर लोकांनी डॉ. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण केले. कॅप देवळालीचे
` स्टेशनवर लोकांची अलोट गर्दी उसळली होती. अनेक संस्थांतर्फे डॉ. बाबासाहेबांना
पुष्पहार अर्पण करण्यात येऊन तेलखोला व नाशिकरोडच्या स्काऊट पथकांचे
` स्टेशन बाहेर गार्ड ऑफ ऑनर (सलामी) झाले. नंतर स्टेशनवरून त्यांची मिरवणूक कॅप देवळालीच्या ज्ञान मंदिरापर्यंत मुख्य-मुख्य अशा रस्त्यांनी आली, मातंग
` मंडळीचा बॅड पुढे वाजत होता. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय" "आंबेडकरांचा
जयजयकार", "आंबेडकर कौन है । दलितोंका राजा हे।।" "तरुण पार्टी
जनता : २३ आणि ३० जानेवारी १९३७.