१६-१-१९३७ या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत - Page 40

२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

झिंदाबाद । थोडे दिनमें भीमराज |" स्वतंत्र मजूर पक्षाच्या जयजयकारात मिरवणूक ज्ञान मंदिरात आली. सुमारे हजारावर जनसमूह अत्यंत अल्पावधीत जमला. श्री. भाऊराव गायकवाड यांनाच मते देऊन निवडून देणे किती. अगत्याचे आहे, या विषयावर अगदी मार्मिकपणे व थोड्या वेळात प्रास्ताविक झाल्यानंतर ज्ञानमंदिरातर्फं पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्याचप्रसंगी तेलखोरा . स्काऊट मंडळातफै पुष्पहार अर्पण करण्यात आला. नंतर नाशिकास येत. असता वाटेत विदगाव, देवळाली, नाशिक रोडवरील दिनबंधू आंबेडकर वाचनालयातर्फं डां. बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. नाशिक येथे श्री. भाऊराव गायकवाड यांनी डॉ. साहेबांना थाटाची "टी पार्टी" दिली. धुळेकर वामनराव पवार यांनी तसेच भगिनीमंडळातर्फे सौ. गिताबाई गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण केला. तेथून सभेसाठी महारवाड्यात जात असता वाटेत श्रीमती अक्काबाई तेजाळे यांनी पुष्पहार अर्पण केला. सभास्थानी डॉ. बाबासाहेब जाताच "डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जय" 'आंबेडकर कौन है । दलितोंका राजा है ।' 'तरुण पार्टी झिंदाबाद । थोडे दिनमें भीमराज' वगैरे गर्जनांनी तेथील वातावरण दुमदुमून गेले. जमलेल्या दीड दोन हजार जनसमुहापुढे डॉ. बाबासाहेबानी भाऊराव गायकवाड यांच्या उमेदवारीस पाठिंबा देणारे भाषण केले. तेथे दाणी मंडळीतर्फँ पुष्पहार अर्पण करण्यात आला. पवळाशी नेटावटे यांनी पुष्पहार अर्पण केला व समस्त महार मंडळीतर्फे श्री. सखाराम काळे यांनी पुष्पहार अर्पण केला. नाशिकात श्री. शिवराम पालाजी मोरे यांच्या दुकानी डॉ. बाबासाहेबांचा फोटो मेघवाळ मंडळीने घेतला. तेथून वरखेड्यास येत अराता वाटेत मसरूळ, ढकांबे, तळेगाव या गावी पुष्पहार अर्पण करण्यात आले. दिंडोरी येथे गावातून मिरवणूक काढण्यात आली. पुढे सुस्वर वाद्ये वाजत होती. डॉ. बाबासाहेबांच्या जयजयकाराने दिंडोरी गाव गजबजून गेला. महारवाङ्यात सुंदरशा मंडपात तयार केलेल्या व्यासपिठावर आरूढ होताच तेथील शेकडो स्त्रियांनी आरती करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भक्तीभावाने व भगिनीप्रेमाने ओवाळून 'इडा पिडा टळो । नी भीमराज लवकर येवो ।।' म्हणाल्या. सदर प्रसंगी भाषण करताना डॉ. बाबासाहेब म्हणाले, 'श्री. भाऊराव गायकवाड हे जरी तुमच्या तालुक्याचे असले तरी वृथा तालुकाभिमानाने हुरळून त्यांना मते देण्यापेक्षा खरे लायक व कर्तबगार उमेदवार म्हणून तुम्ही सर्वानी त्यांना आपली चारही मते देणे जरूरीचे आहे', पुष्पहार अर्पण झाल्यानंतर पुढे आवनखेड येथेही पुष्पहार अर्पण करण्यात आला. आंबेवणी