२०-७-१९४२ शिक्षित व्हा. चळवळ करा, संघटित व्हा आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका ही आमच्या जीवनाची पंचसूत्री - Page 459

शिक्षित व्हा, चळवळ करा, ..... जीवनाची पंचसूत्री ४२१

आली. नवीन राजावर आपली राजनिष्ठा व्यक्‍त करण्याकरिता त्यांना राजाला आयुरारोग्य चितन करावे लागत असे. राजाला आयुरारोग्य चिंतिणे ही आता सर्वसामान्य बाब झाली आहे व त्या प्रथेचे मूळ काय हे शोधण्याची कोणाला गरजही

वाटत नाही. मी सांगितल्याप्रमाणे, या प्रथेचे मूळ, ज्यांची निष्ठा शंकास्पद वाटते

त्यांनी स्पष्टपणे ती राजनिष्ठा जाहीररीत्या व्यक्‍त करावी, या हेतूत आहे. तुमची निष्ठा संशयातीत आहे याची जाण मला असल्यामुळे ती पुन्हा अशा मानपत्राद्वारे तुम्ही व्यक्त करण्याची काहीच आवश्यकता नव्हती. आता हे मानपत्र स्वीकारावे असा तुम्ही मला आग्रह धरला आहे. माझ्या विषयी तुमच्या मनात वसत असलेल्या प्रेम व आदर या सद्भावनांचे प्रतीक म्हणून या मानपत्राचा मी स्वीकार करतो. दलित वर्गाकरिता मी जे काही केले आहे ते तुम्हाला मान्य झाले

असल्याचेच हे प्रतीक मी समजतो. भारतातील अस्पृश्य वर्गाच्या वतीने भारतीय राजकारणात मी त्यांची बाजू उचलून धरताना जे धोरण स्वीकारले आहे त्याला

तुमचा पाठिंबा आहे असे या मानपत्रावरून प्रमाणित होते. या देशाचे शासन

चालविण्यात हिंदू व मुसलमान यांच्या बरोबरीचे सन्माननीय भागीदार-सन्माननीय

व समान स्तरावरील भागीदार- म्हणून अस्पृश्य वर्गाला मान्यता मिळावी हे आपले

घ्येय आहे. आपण जे ध्येय ठरविलेले आहे ते मिळविण्यासाठी मी निर्धाराने झटेल

असे मी आपणास आश्वासन देतो.

ध्येयसिद्धीकरिता मी झटेल अशा प्रकारच्या माझ्या आश्वासनाची तुम्हाला

कमीच गरज आहे. वस्तुतः तुमच्याच आश्वासनाची मला अतिशय गरज

आहे. तुम्ही माझ्याबद्दल प्रेम व आदर व्यक्त केला आहे, त्याची काहीच

आवश्यकता नव्हती. मला तुमच्याकडून दुसऱ्याच प्रकारचे आश्वासन पाहिजे

आहे. ते आश्वासन म्हणजे शक्ती, ऐक्य व आपल्या हक्कांच्या बाजूने उभे

राहण्याचा, आपल्या हक्कांकरिता लढण्याचा आणि आपले हक्क मिळवून विजयी

होईपर्यंत कधीही माघार न घेण्याचा तुमचा निर्धार ! ही तुमची जबाबदारी पार

पाडण्याकरिता तुम्ही वचनबद्ध झाले पाहिजे. मी आपल्या कर्तव्याकरिता

वचनबद्ध आहे. न्याय आपल्या बाजूने असल्यावर आपण हा लढा हारण्याचे

काहीच कारण मला दिसत नाही. संग्राम माझ्या जीवनातील विशेष आनंददायी

पर्व आहे. हा संग्राम पूर्णार्थाने आध्यात्मिक आहे. यात भौतिक अथवा नीच

असे काहीही नाही. कारण आपला हा संग्राम म्हणजे संपत्तिकरिता किंवा

सत्तेकरिता संग्राम नव्हे. स्वातंत्र्याकरिता हा संग्राम आहे. मानवी व्यक्तित्वाच्या

विकासाकरिता हा संग्राम आहे. जे मानवी व्यक्तित्व हिंदू समाजव्यवस्थेमुळे

चिरडून व छिन्नभिन्न करण्यात आले आणि या राजकीय लढ्यात हिंदू जिकले