२०-७-१९४२ शिक्षित व्हा. चळवळ करा, संघटित व्हा आत्मविश्वास बाळगा, कधीही धीर सोडू नका ही आमच्या जीवनाची पंचसूत्री - Page 460

४२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

व आपण हारलो तर आपण कायमचे चिरडले जाऊ व त्यांचे दमन सतत चालू राहील. माझा तुम्हाला शेवटी हाच हितोपदेश आहे ; शिक्षित व्हा, चळवळ करा (लढा उभारा), संघटित व्हा, आत्मविश्वास बाळगा आणि कधीही धीर सोडू नका ! तुम्ही माझ्या बरोबर राहाणार आहात याची मला जशी जाणीव आहे तसेच मी सुद्धा तुमच्याबरोबर सदैव राहाणार आहे.