२०-९-१९४४ इतर कुठल्याही जमातीपेक्षा अस्पृश्यांना स्वातंत्र्याविषयी अधिक आस्था आहे - Page 493

इतर कुठल्याही जमातीपेक्षा....... आस्था आहे ४५३

त्यांना इतरांबरोबर राजकीय दर्जा पाहिजे. ती या देशात शासनकर्ती जमात बनली पाहिजे, याकरिता आपली चाललेली चळवळ जर देशबुडवी आहे असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांच्या या करणीबद्दल मला मुळीच आश्‍चर्य वाटत नाही. अस्पृश्यांना इतर कुठल्याही जमातीपेक्षा स्वातंत्र्याविषयी कमी आस्था नाही, उलट ती अधिक आहे. परंतु देशाच्या स्वातंत्र्याबरोबर स्वतःच्या समाजाचेही स्वातंत्र्य आम्हाला हवे आहे. '*

RSS FE

१ जनता : २ डिसेंबर १९४४. |