४-१-१९४५ सत्ता कोणाचीही असो. अस्पृश्यांना दडपण्याचाच प्रयत्न होइल - Page 526

२१७
सत्ता कोणाचीही असो अस्पृश्यांना
दडपण्याचाच प्रयत्न होईल

कलकत्ता येथे शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे मुखपत्र म्हणून नवीनच सुरू

झालेल्या ' पीपल्स हेराल्ड ' या इंग्लिश साप्ताहिकाचे प्रकाशन डॉ. बाबासाहेब

आंबेडकर यांच्या हस्ते ता. ४ जानेवारी १९४५ रोजी झाले. या प्रसंगी ते आपल्या

महत्त्वपूर्ण भाषणात म्हणाले,

काँग्रेसच्या राजकारणाचा इतका अधःपात झाला आहे की गांधींच्या नंतर

काँग्रेसच्या ठिकऱ्या उडालेल्या आपणास दिसतील. राजकीय व नैतिकदृष्ट्या

आपल्या अस्पृश्य समाजाचा पक्ष हाच या देशातील चिरकाल टिकणारा पक्ष राहील.

आपल्या पक्षाबद्दल विरोधकांकडून जाणूनबुजून गैरसमज पसरविण्यात येतात. केवळ काही नोकन्यांसाठी आणि अन्नाच्या तुकड्यांसाठी आपल्या पक्षाचा लढा आहे, हा आरोप मूर्खपणाचा आहे. त्यात काही अर्थ नाही. वास्तविक, या देशात स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व या तत्त्वांची प्रस्थापना करण्याकरता अस्पृश्य समाजाचा पक्षच खरा लढा देत आहे आणि या बाबतीत आपल्या पक्षाची तत्त्वप्रणाली केवळ अस्पृश्य समाजाचाच प्रश्‍न सोडविण्याचा, ही मर्यादित ध्येयमर्यादा ओलांडून केव्हाच वरील तीन उदात्त आणि सर्वश्रेष्ठ तत्त्वावर जाऊन भिडली आहे.

कॉग्रेसच्या राजकारणात या गोष्टींचा पूर्ण अभाव आपणास दिसून येतो. काँग्रेस देशाच्या स्वातंत्र्याचा दावा करते पण त्यात ढोंगीपणा आहे. काँग्रेस ही निर्भेळ रवातंत्र्य किंवा समता यासाठी मुळीच लढत नाही. काँग्रेसच्या स्वातंत्र्यात आपणाला स्वातंत्र्य मिळण्याची आशा नाही. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समता मिळणार नाही, आपणाला बंधुभावाने वागविले जाणार नाही. म्हणून काँग्रेसच्या ह्या स्वातंत्र्य लढ्याच्या व्यापक चळवळीमध्ये भाग घेण्याऐवजी, हजारो वर्ष गुलामगिरीमध्ये अडकून पडलेल्या माझ्या अस्पृश्य समाजाच्या उद्घारकार्यासाठी मी माझे जीवित वाहून घेतले आहे. देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा अस्पृश्योद्धार हाच माझा आयुष्यातील जिव्हाळयाचा प्रश्‍न आहे. हिंदुस्थानमध्ये, अस्पृश्योद्धारापेक्षा उदात्त आणि श्रेष्ठ

जनता : १३ जानेवारी १९४५.