२२७
शिक्षणाशिवाय मार्याच्या जागा
काबीज करता येणार नाहीत
मुंबई इलाखा शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशनचे अध्यक्ष श्री. भा. कू. गायकवाड यांनी तारीख १ व ८ डिसेंबर १९४५ च्या 'जनते' त प्रसिद्ध केले की, आपल्या समाजाचे एकमेव पुढारी नेक नामदार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, एम. ए., पीएच.डी., डी. एससी., बार-अँट-लॉ. हिंदुस्थान सरकारचे लेबर मेंबर (मजूर मंत्री), यांना कामाच्या व्यापामुळे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश.
व पूर्व खानदेश या दरेक जिल्ह्यास भेट देणे अशक्य झाल्याने या चार जिल्ह्यांच्या
विद्यमाने रविवार तारीख ९ डिसेंबर १९४५ रोजी सायंकाळी ४ वाजता मनमाड सारख्या मध्यवर्ती ठिकाणी सभा घेण्यात येत आहे. ते 'अस्पृश्य मानलेल्या समाजाचे आजचे कर्तव्य' या विषयावर जाहीर व्याख्यान देणार आहेत. अशा या सुवर्ण संधीचा फायदा सर्व बंधु-भगिनींनी हजर राहून अवश्य घ्यावा. असे आगाऊ जाहीर झाल्याप्रमाणे मनमाड येथे नाशिक, अहमदनगर, पश्चिम खानदेश
व पूर्व खानदेश या जिल्ह्यांच्या विद्यमाने रविवार ता. ९ डिसेंबर १९४५ रोजी .
मनमाड येथे प्रचंड सभा झाली.
या सभेसाठी मुंबईहून डॉ. बाबासाहेब आंबेडकर रविवारी सकाळच्या गाडीने निघाले होते. |
महाराष्ट्रातील अस्पृश्यांच्या या बालेकिल्ल्याला जवळ जवळ सहा-सात वर्षांच्या कालावधीनंतर डॉ. बाबासाहेब भेट देणार होते. अस्पृश्य जनता आपल्या या वंदनीय पुढाऱ्याच्या दर्शनासाठी आतूर झालेली होती. बऱ्याच लांबलांबच्या भागातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी मनमाडकडे कूच करीत असताना दिसत होत्या, उन्हा-तान्हातून, काटे-कणेच्यातून लोक मार्ग काढीत होते. पाठीशी शिदोऱ्या बांधून, विजय मार्गावरील अस्पृश्यांच्या चळवळीचा जयघोष करीत फार दिवसातून
आज आमचा मोहरा पुन्हा आम्हाला आमच्या भागात दिसणार, ही जाणीव उराशी
बाळगून या चार जिल्ह्यातून अस्पृश्य जनता आनंदोत्सुक्याने मनमाड येथे गोळा झाली होती. अगदी प्रचंड संख्येत जवळ जवळ पाऊण लाखांचा अस्पृश्यांचा जमाव जमला होता.
दुपारी बरोबर सव्वा दोन वाजता डॉ. बाबासाहेबांची गाडी स्टेशनात आली. निनाद, जयघोष, गगनभेदी घोषणांनी सारे स्टेशन हादरत असल्याचा भास होत होता. डॉ. बाबासाहेबांचे कंपार्टमेंट पुष्पहारांनी भरगच्च दिसत होते.
जनता : १५ डिसेंबर १९४५.