रेट.
अधिकारांचे किल्ले ताब्यात असले
तर भय बाळगण्याचे कारण नाही
दिनांक ९ डिसेंबर १९४५ रोजी मनमाड येथील अस्पृश्य विद्यार्थी बोडिंगच्या
इंमारतीची कोनशिला बसविल्य़ानंत्तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जाहीर सभेच्या ठिकाणी आले,-या सभेला; सव्वा सहा वाजता सुरूवात झाली: . मुंबई प्रांतिक शेड्यूल्ड कास्ट्स्. फेडरेशनचे अध्यक्ष श्री. भाऊराव कू. गायकवाड व आंध्र प्रांतिक. शाखेचे सेक्रेटरी क्री. सुर्यप्रकाशमराव . यांची प्रास्ताविक भाषणे झाल्यावर डॉ. बाबासाहेब बोलावयास उठले. . सुमारे पाऊण लाखांच्या अस्पृश्य जनसमुदायासमोर त्यांनी एक तास भाषण केले. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात भाषणास सुरूवात करताना ते म्हणाले 0 त
धु आणि भगिनींनो, |
. आज सहा-सात वर्षांच्या कालावधीनंतर य़ा ठिकाणी मी आलो.आहे. याचे
कारण असे आहे. की, सर्व हिंदुस्थानात अस्पृश्य. समाजाच्या, कार्याविषयी लढ्याविषयी सर्वात जास्त जागृत असा महाराष्ट्र हा एकच भाग आहे आणि म्हणून या भागात वारंवार येण्याची मला तितकिशी जरुरी भासत नाही. तरी पण आज या ठिकाणी येणे विशेष महत्त्वाचे वाटल्यावरूनच मी आलो आहे
आज या देशात काँग्रेस, मुस्लिम लीग, हिंदू महासभा वगैरे अनेक राजकीय
पक्ष आहेत. हा प्रत्येक पक्ष आपापल्या परीने राजकीय मागण्या मागत आहे. मुसलमान लीक पाकिस्तानं मागतं आहेत. काँग्रेस स्वराज्य मागत आहे. आम्हांलाही स्वराज्य पाहिजे आहै. ` स्पराज्याबद्देल काँग्रेसचा व आमचा मतभेद नाही. काँग्रेराचे लोक ब्रिटिशांना सांगत आहेत की हिंदुस्थान आमचा आहे. हिंदुस्थानच्या राजकारणाच्या किल्ल्या ' आमच्या हाती. द्या आणि हिंदुस्थानातून चालते व्हा. पण गेली वीस वर्ष काँग्रेसला मी एक प्रश्न विचारील आहे. . . त्याचे उत्तर मात्र गांधी अगर काँग्रेसचे लोक देत नाहीत
तो. प्रश्न. हा. की; तुम्ही .जे स्वराज्य: मागता त्या स्वराज्यात कोणाचे राज्य कोणावर होणार आहे? राज्य कोणी करायचे? आणि. ते कोणावर ? हिंदुनी अस्पृश्यांवर राज्य करावयाचे असे काही आहे काय ? हे जें स्वराज्य मिळणार आहे ते स्वराज्य कौणांचे ? तुम्हाला कंदाचित तुमचे स्वराज्य मिळेल परंतु तुमचें स्वराज्य म्हणजे आमची गुलामगिरीच ना? | is eS ie ins age oo Le ner ore जनता : १५ डिसेंबर १९४५