३०-५-१९३७ केवळ निवडणुकीत विजय मिळाल्याने चळवळीचे कार्य संपले असे समजू नका - Page 66

२८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

विरून जावयाचे नाही. काँग्रेस ही संस्था सर्व प्रकारच्या लोकांची खिचडी आहे. भांडवलदार-मजूर, जमीनदार-शेष्ष्करी, खोत-सावकार व कुळे, शत्रू-मित्र अशा परस्पर विरोधी वर्गाचा सबगोलंकारी पक्ष म्हणजेच काँग्रेस होय. अशा सबगोलंकारी काँग्रेसकडून गोरगरिबांचे कधीही कल्याण होणार नाही. आपला स्वतंत्र मजूर पक्ष कामकरी व शेतकरी वर्गावर श्रीमंतांकडून जो जुलूम व अन्याय होत आहे तो नाहीसा करण्यासाठी स्थापन झालेला आहे. काँग्रेसच्या आजच्या परिस्थितीवरून पाहता तिच्यामध्ये पुढे मागे दुफळी झाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे आणि त्यावेळी काँग्रेसमधील आपल्या विचाराची माणसे आपल्या पक्षाला येऊन मिळतील, याबद्दलही मला शंका वाटत नाही.

तात्पुरत्या लाभाकरिता आम्ही काँग्रेसला मिळून अप्रामाणिकपणा करू शकत नाही. आम्हाला राष्ट्रकार्य करावयाचे आहे. सार्वजनिक हिताच्या प्रश्‍नासंबंधी एकमत होईल त्यावेळी तात्पुरते भेदभाव विसरून आम्ही काँग्रेसबरोबर सहकार्य करू परंतु सर्व प्रकारचे भेदभाव कायमचे विसरून काँग्रेसबरोबर एकजीव होणे आम्हाला कधीच शक्‍य होणार नाही.

सध्याच्या तात्पुरत्या मंत्रीमंडळात मी दिवाणगिरी का स्वीकारली नाही ? असा प्रश्‍न पुष्कळ लोक मला विचारतात. त्याचे उत्तर एवढेच की, ज्या मंत्रीमंडळाला बहुमताचा पाठिंबा नाही ते मंत्रीमंडळ फार दिवस टिकणे शक्य नाही आणि असल्या औटघटकेच्या राज्यकारभारात भाग घेण्याने कोणत्याही तऱ्हेचा फायदा होऊ शकत नाही.

मंत्रीमंडळे बनविण्याचे नाकारून काँग्रेसने राजकारणाच्या गाड्याला खीळ घालण्याचा जो सध्या प्रयत्न चालविलेला आहे त्यापासून काँग्रेसचा काहीएक फायदा होणार नाही. काँग्रेसने गव्हर्नराकडून मागितलेले आश्वासन अगदीच अनावश्यक आहे. काँग्रेस पक्षाच्या पुढाऱ्यांनी अधिकारपदे स्वीकारून राज्यकारभार चालविणे हाच मार्ग काँग्रेसच्या दृष्टीनेदेखील श्रेयस्कर आहे. राज्य घटना मोडण्याचे धोरण स्वतंत्र मजूर पक्षाला मान्य नाही. घटना रद्द झाल्यास पिळल्या जाणाऱ्या शेतकरी-कामकरी वर्गाची दुःखे आणि गाऱ्हाणी थोड्याबहुत प्रमाणात नाहीशी करण्याचा मार्गदेखील बंद होईल. काँग्रेसचा साम्राज्यशाही विरोधी लढा संपेपर्यंत आम्ही आपली दुःखे उराशी बाळगून कष्ट सोशीत बसण्याला मुळीच तयार नाही. कायदेमंडळापुढे मांडावयाच्या कायद्याचे मसुदे आमच्या खिशात तयार आहेत. आम्ही फक्त खेळ सुरू होण्याचीच वाट पाहात आहोत. “१ |

७ ७ ७

* जनता : १२ जून १९३७.