३०-५-१९३७ केवळ निवडणुकीत विजय मिळाल्याने चळवळीचे कार्य संपले असे समजू नका - Page 65

केवळ निवडणुकीत विजय मिळविल्याने . . . . . असे समजू नका २७

विजय मिळविल्याने आपल्या चळवळीचे कार्य संपले, असे समजू नका. नवीन कायदेमंडळाची मुदत पाच वर्षांची असली तरी या मुदतीच्या आत देखील हे कायदेमंडळ मोडून टाकण्याचा अधिकार गव्हर्नरला आहे. असा प्रसंग केव्हा येईल हे आज जरी सांगता आले नाही तरी फेरनिवडणुकौसाठी आपण आपल्या पक्षाची सर्व प्रकारची जय्यत तयारी ठेवली पाहिजे आणि सूचना मिळताच ' अवघ्या पाच मिनिटात आपण निवडणुकीच्या संग्रामाला सिद्ध झाले पाहिजे. स्वतंत्र मजूर पक्षाने आज बहुजन समाजात जो आत्मविश्वास आणि जागृती निर्माण केली आहे ती अखंड चालू ठेवण्याची योग्य खबरदारी. आपण सर्वानी घेणे अत्यंत जरूर आहे. पक्ष संघटनेच्या दृष्टीने ठिकठिकाणी पक्षाच्या शाखा स्थापन

केल्या पाहिजेत. :काँग्रेस पक्षाबरोबर पुनश्च दोन हात करण्याचा प्रसंग

आल्यास आपल्या पक्षाचा जोम पूर्वीपिक्षाही अधिकच वाढलेला. आहे, ही गोष्ट

आपण जगाच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.

जाता जाता चालू परिस्थितीविषयी दोन शब्द बोलणे जरूर आहे. तुम्हाला

ठाऊकच आहे की, आज राजकीयक्षेत्रात जिकडे तिकडे थंड वातावरण

निर्माण झालेले आहे. सारा राजकीय खेळ बंद झाला आहे आणि सर्वबाजूला

उद्वेगजनक परिस्थिती दृष्टोत्पत्तीस येत आहे. मात्र या परिस्थितीची जबाबदारी आपल्यावर बिलकुल नाही. राजकारणात अल्पसंख्य पक्षाला

पुढाकार घेऊन काही करता येत नाही. लोकहितासाठी काहीतरी भरीव

स्वरूपाचे कार्य करण्याची कायदेमंडळातील जबाबदारी आमच्याकडून पार

पडली नाही तर त्याचा दोष ज्यांनी हा विपरीत प्रसंग निर्माण केला त्यांच्याच

डोक्यावर बसेल. आज राजकारणाचा डाव बंद पडला असला तरी ज्या

दिवशी हा डाव नव्याने सुरू होईल, त्यावेळेस जरूर असणारी तयारी

आमच्याजवळ मजबूत आहे. आम्हाला जे कायदे घडवून आणावयाचे आहेत

त्यांचे बार आमच्याजवळ भरून तयार आहेत. टारगेट लावण्याची खोटी को,

आम्ही एकदम आमचे पिस्तूल झाडणार आहोत. आज जरी सर्वत्र निराशेचे

वातावरण पसरलेले असले तरी लवकरच आशायुक्त परिस्थिती निर्माण

झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला. निराश होण्याचे बिलकूल कारण

नाही. प्रांतिक कायदेमंडळात जी माणसे तुमच्यातर्फ निवडून गेली आहेत ती

तुमच्या हितासाठी सदैव जागृत राहतील, असे मी तुम्हाला आश्‍वासन देतो.

काँग्रेसशिवाय इतर पक्षांतर्फे निवडून आलेल्या उमेदवारांना आपला पक्ष सोडून

काँग्रेसमध्ये जावे, असे वाटत आहे. परंतु आम्ही अशा दुबळ्या वृत्तीने कॉग्रेसला

कधीच मिळणार नाही. आम्हाला श्रमजीवी बहुजन समाजाच्या सर्वागीण

हितासाठी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष जिवंत ठेवावयाचा आहे. आमची

१४ जणांची संख्या अल्प असली तरी आम्हाला लाभालोभासाठी कोणत्याही संस्थेत