६२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
या तुमच्या प्रश्नामुळे तुमच्या डोक्यात काही तरी घोटाळा झालेला आहे असे मला वाटू लागले आहे. मी आजपर्यत तुम्हाला जे जे शिकविले त्याचा तुम्हाला पूर्णपणे बोध झाला नसावा असे मला वाटू लागले आहे. तुम्ही एक गोष्ट ध्यानात ठेवा व त्याप्रमाणे वागा म्हणजे तुमचे प्रश्न तुम्हाला स्वतःलाच आपोआप सोडवता येतील. म्हणजे केवळ एखादी गोष्ट मी तुम्हाला सांगतो म्हणूनच ती सत्य असली पाहिजे असे तुम्ही बिलकूल मानू नका. ती गोष्ट तुमच्या विचारशक्तीला, तुमच्या तर्कशक्तीला पटत असेल तरच तुम्ही ती खरी माना, नाही तर तुम्ही ती खुशाल टाकून द्या. हीच माझी शिकवण आहे. "'
गौतम बुद्धांच्या या म्हणण्याचा काय अर्थ आहे बरे ? त्याचा अर्थ असा आहे की प्रत्येक मनुष्याला विचारस्वातंत्र्य आहे. पण त्या स्वातंत्र्याचा उपयोग त्याने सत्यशोधन करण्यात केला पाहिजे आणि सत्य म्हणजे तरी काय बरे ? सत्य हेच आहे की मनुष्याच्या पंचज्ञानेंद्रियांना व पंचकर्मेद्रियांना ते सत्य पटले पाहिजे. म्हणजे ते सत्य पाहाता आले पाहिजे, ऐकता आले पाहिजे, त्याचा वास घेता आला पाहिजे, त्याचा स्वाद घेता आला पाहिजे व त्याच्या अस्तित्वाबद्दल आपल्याला साक्ष पटविता आली पाहिजे.
ही ध्येये गौतमांनी आपल्या शिष्यांपुढे ठेविली होती आणि हीच ध्येये आमचे सिद्धार्थ कॉलेज अनुसरणार आहे. (१) सत्य शोधून काढणे व (२) जो धर्म आपल्याला मानवता शिकविल त्याच धर्माचे अनुसरण करणे.
आधुनिक विचारांची प्रणाली कोणत्या दिशेने वाहते आहे ते मला माहीत आहे आणि मी तुम्हाला हेही सांगून ठेवतो की, कार्ल मार्क्सच्या तत्त्वज्ञानाशीही मी काही अपरिचित नाही. त्याचे धार्मिक विचारही मला अपरिचित नाहीत. तो म्हणतो की धर्म म्हणजे अफू आहे ! पण हे त्याचे म्हणणे मला पटण्यासारखे नाही. मला वाटते की सत्य शोधून काढणे म्हणजेच सत्यधर्म. सत्य आणि सत्ता या
परस्परविरोधी गोष्टी आहेत. {Truth and authority are inconsistent), शास्त्र सुद्धा कोणत्याही गोष्टीची परिपूर्णतः (र!) मान्य करीत नाही म्हणून सत्य सुद्धा कालपरत्वे अपूर्णच असल्याने त्याचा पुनः पुनः शोध करणेच प्राप्त असते. म्हणूनच जगामध्ये पुर्णतया पवित्र (53०7०७३१०४) असे काहीच नाही.
` धर्म म्हणजे सत्य आहे हे आम्ही शिकले पाहिजे. नहि सत्यात्परो धर्मः ! हेच आपले ध्येय असायला पाहिजे. आपण केव्हाही इतरांना दुखविता कामा नये, हीच आमच्या धर्माची खरी शिकवण असली पाहिजे. सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे हे आपल्या ह्या कॉलेजचे ध्येय आहे.