सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे - Page 99

सत्य शोधण्याच्या कामात' `` ` ` ` ` ` मिळाले पाहिजे ६१

बुद्धानीच हे ध्येय आपल्या समोर ब्रह्मजालसूत्रात सांगून ठेविले आहे. त्या सूत्रात अशी गोष्ट सांगितली आहे. ' हिंदुस्थानामध्ये औपनिषर्दिक तत्त्वज्ञानाचा प्रसार झालेला आहे अशी आपली समजूत आहे. या तत्त्ववेत्यांचा ब्रह्मावर विश्वास आहे. एकदा बरेचसे ब्राह्मण तत्त्वज्ञानी गौतमाला भेटायला आले. गौतमाच्या शिष्यांनी आपल्या गुरूला सांगितले, ' आपल्या भेटीची अपेक्षा करून ते ब्रह्मवादी तत्त्वज्ञानी आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. यांनी एक नवीन तत्त्वज्ञान प्रस्थापित केलेले आहे आणि या तत्त्वज्ञानातील मुख्य दैवत म्हणजे ब्रह्म होय असे त्यांचे म्हणणे आहे. गुरूजी, आपणाला याविषयी काय सांगावयाचे आहे ते जाणण्याची आम्हा साऱ्यांची इच्छा आहे ''.

गौतमांनी यावर. जे उत्तर दिले ते अत्यंत विचारार्ह आहे असे मला वाटते. गौतमांनी या ब्रह्मवाद्यांना प्रश्‍न केला, “ तुम्ही ब्रह्म पाहिले आहे काय?” "नाही.'' असे उत्तर मिळाले. " तुम्ही ब्रह्माबरोबर भाषण केले आहे काय ? “ “नाही.” " तुम्ही ब्रह्माविषयी काही ऐकले तरी आहे का ? “ “नाही.” " तुम्ही ब्रह्माची चव घेऊन पाहिली आहे का ? " पुन्हा उत्तर आले “नाही.” " मग तुमच्या पंचज्ञानेंद्रियांनी व पंचकर्मेद्रियांनी ब्रह्म काय आहे हे अनुभविले नाही म्हणता तर मग ब्रह्म आहे, म्हणजे ब्रह्माचे अस्तित्व आहे हे तरी कशावरून तुम्ही म्हणता ? “ यावर त्या ब्रह्मवाद्यांना काही एक उत्तर देता आले नाही.

आता मी तुम्हाला गौतमाच्या आणखी एका व्याख्यानाविषयी सांगतो. त्याविषयी ' महापरिनिब्बानसूत्रा ' मध्ये विवेचन केलेले आढळून येते. गौतम हे आसन्नमरणावस्थेत होते. त्यावेळी त्यांचे मुख्य शिष्य हे कुशिनारा या ठिकाणी राहातं होते. त्यावेळी त्यांचे मुख्य शिष्य आनंद यांनी गौतमाला विचारले, ` “ महाराज, आपल्याला एवढ्या लवकर निर्वाण घेता येणार नाही. अद्याप कितीतरी गोष्टी राहिलेल्या आहेत की, ज्याविषयी आपण आम्हाला काही एक निर्णय दिलेला नाही की त्याविषयी आपण आम्हाला काही मार्गदर्शन केलेले नाही !'' बुद्धांनी यावर जे उत्तर दिले ते अत्यंत विचारणीय आहे. ते म्हणाले,

मी लुम्हामध्ये आज चाळीस वर्षे राहिलो आहे म्हणजे आता माझ्या वयाला पूर्ण ऐंशी वर्षे झाली आहेत. मी तुमच्या संगतीत इतकी वर्षे राहिलो असल्याने अद्यापिही काही समर्पक उत्तरे माझ्याकडून तुम्हाला मिळाली नाहीत असे तुम्ही म्हणता त्याचे मला फार आश्चर्य वाटते. माझ्याकडून सारी उत्तरे मिळाली नसतील हे मला अशक्य वाटते. आमच्या आतापर्यंतच्या चाळीस वर्षाच्या संभाषणात सांगण्यासारखे अद्यापि काही बाकी राहिले असेल असे मला वाटत [नाही. ]