राजकीय पक्षांनी स्वत:च्या ... .. . . आल्याशिवाय राहाणार नाही १३१
निश्चित की जर पक्षांनी स्वत:च्या तत्त्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर आपले स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात आल्याशिवाय राहाणार नाही. आणि कदाचित कायमचे घालविले जाईल. या संभाव्यतेविरुद्ध लढण्यासाठी आपण कटिबद्ध व्हायला हवे. आपल्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपल्या स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आपण निर्धार केलाच पाहिजे. (हर्षध्वनी)
२६ जानेवारी १९५० ला भारत एक लोकसत्ताक देश होईल तो या अर्थाने की, भारतात त्या दिवसापासून लोकांचे, लोकांनी बनविलेले आणि लोकांसाठी असलेले सरकार प्राप्त होईल. तोच विचार माझ्या मनात येतो, ह्या लोकसत्ताक संविधानाचे काय होणार? हा देश ते अबाधित ठेवण्यासाठी समर्थ राहील की पुन्हा तो ते गमावून बसेल. माझ्या मनात येणारा हा दुसरा विचार आहे आणि पहिल्याप्रमाणेच तो मला चिंतातूर करणारा आहे.
भारताला लोकशाही म्हणजे काय हे माहीत नव्हते असे नाही. एक काळ असा होता की, भारत हा गणराज्यांनी भरगच्च होता आणि जिथे कुठे राजेशाही असेलच तर ती एकतर निवडलेली किंवा सीमित असायची. त्या प्रणाली कधीही अनिर्बंध नव्हत्या. भारताला संसद किंवा संसदीय प्रणाली माहीत नव्हती असे नाही. बौद्ध भिक्खू संघाच्या अभ्यासातून हे स्पष्ट होते की, त्यावेळी केवळ संसदच होती असे नव्हे--संघ हे दुसरे काही नसून संसदच होते- तर आधुनिक काळाला परिचित असलेल्या सांसदीय कार्यप्रणालीचे सर्व नियम संघाला माहीत होते आणि त्यांचे ते पालन करीत होते. बसण्याच्या व्यवस्था, विधेयक मांडण्याचे नियम, ठराव, कामकाजासाठी आवश्यक असलेली किमान संख्या, [पक्ष ] प्रतोदाने आदेश काढणे, मतमोजणी, मतपत्रिकेद्वारे मतदान करणे, कपात सूचना, नियमितता, न्यायव्यवस्था इत्यादिबाबत त्यांच्याजवळ नियम [होते. ] संसदेच्या कामकाजाचे हे नियम बुद्धाने संघाच्या सभेसाठी उपयोगात आणले असले, [तरी ] देशात त्याकाळी कार्यरत असलेल्या राजकीय विधीमंडळांच्या [नियमावलीतूनच ] त्यांनी ते स्वीकारले असले पाहिजेत.
ही लोकसत्ताक पद्धती भारताने गमावली. पुन्हा दुसऱ्यांदा तो ती गमावणार काय ? मला माहित नाही, परंतु भारतासारख्या देशात हे सहज शक्य आहे की,-लोकशाही प्रदीर्घकाळपर्यंत उपयोगात नसल्यामुळे ती अगदीच नवीन भासण्याची शक्यता आहे-जिथे लोकशाहीने हुकूमशाहीला स्थान देण्याचा धोका आहे. हे सहजशक्य आहे की, नव्यानेच जन्माला आलेली लोकशाही आपले बाह्य स्वरुप सांभाळेल परंतु प्रत्यक्षात ती हुकूमशाहीला स्थान देईल. जर प्रचंड बहुमत असले तर दुसरी शक्यता वास्तवात येण्याचा मोठा धोका आहे.
केवळ बाह्या स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल तर त्यासाठी आपण काय करायला हवे ? माझ्या मते