२५-१-१९४९ राजकीय पक्षांनी स्वत:च्या तत्वप्रणालीला देशाप मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही - Page 213

राजकीय पक्षांनी स्वतःच्या .. .. _ _. . आल्याशिवाय राहाणार नाही १७५

राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट, त्या समाजजीवनात विभागणी

करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातींमध्ये मत्सर व

तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे

असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती

नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वाशिवाय असलेली समता

आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरासारखा केवळ बाह्य देखावा असेल.

आपल्यासमोर असलेल्या अवघड, जिकिरीच्या कामाबद्दल माझ्या या प्रतिक्रिया

आहेत. काहींना त्या कदाचित फार आनंददायी वाटणार नाहीत. या देशात

राजकीय सत्ता ही मुठभर लोकांची मक्तेदारी राहिली आहे आणि बहुतांश लोक

केवळ ओझे वाहणारे प्राणीच नव्हे तर भक्ष्यस्थानी असलेले प्राणी झाले आहेत. हे

कोणालाही नाकारता येणार नाही. या मक्तेदारीने त्यांना केवळ विकासाच्या

संधीपासूनच वंचित ठेवले असे नव्हे तर मानवी जीवनाचे महत्त्वही कळणार नाही

इतका त्यांचा निःपात केला आहे. हे पददलित वर्ग त्यांच्यावर होत असलेल्या

हुकूमतीला कंटाळले आहेत. स्वतःच राज्य करण्यासाठी ते आतूर झाले

आहेत. पददलित समाजातील लोकांमध्ये निर्माण झालेल्या या तीव्र आकांक्षा

वर्गसंघर्ष आणि वर्गयुद्ध होण्याइतपत वाढू देता कामा नये. त्याचा परिणाम घर

दुभंगण्यात होईल. तो निश्चितपणे विनाशकारी दिवस असेल. अब्राहम

लिकन यांनी समर्पकरित्या म्हटल्याप्रमाणे. दुभंगलेले घर अधिक काळपर्यंत टिकू

शकत नाही. त्यांच्या आकांक्षाच्या पूर्तीसाठी जेवढ्या लवकर त्यांना संधी

उपलब्ध करुन देता येईल तेवढे ते मूठभरांच्या हिताचे, देशाच्या हिताचे, त्याच्या

स्वातंत्र्याच्या रक्षणार्थ आणि त्याच्या लोकसत्ताक संरचना टिकून राहाण्यासाठी

अधिक उपयुक्त ठरणार आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात समता आणि बंधुत्व

प्रस्थापित करण्यानेच हे शक्य होणार आहे. त्यामुळेच त्यांच्यावर मी इतका भर

दिला आहे.

मी सभागृहाला अधिक थकवू इच्छित नाही. स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे

याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या

टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे,

कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता [येणार ] नाही. यापुढे जर काही वाईट घडले तर त्यासाठी आपल्याशिवाय इतर

कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका

आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोक सुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा

मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कटाळा येवू लागला

\

|

hb