११-१-१९५० हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरणे केले पाहिजे - Page 215

२६३ |
हिंदू कायद्याचे सुसूत्रीकरण केले पाहिजे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत असल्याचा सुयोग साधून, सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थी-पार्लमेंटने, त्यांना ' हिंदू कोड बिला ' वर भाषण करण्याची विनंती केली. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टरसाहेबांचेच अपत्य असल्याने, त्यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीस मान दिला आणि हिंदू कोड बिलावर भाषण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे, ता. ११ जानेवारी १९५० रोजी बुधवारी सकाळी ९.०० वाजता, त्यांचे भाषण, सुंदराबाई हॉलमध्ये भरलेल्या , विद्यार्थी-पार्लमेंटच्या अधिवेशनात झाले.

बुधवारी सकाळी ८.०० लाच सुंदराबाई हॉल विद्यार्थ्यांनी चिक्कार भरून गेला होता. विद्यार्थीनीची संख्या बरीच मोठी होती. श्रोते म्हणून बाहेरील प्रतिष्ठित मंडळीही हजर होती. लाऊड स्पीकरची खास व्यवस्था करण्यात

आली होती.

डॉक्टरसाहेब बोलावयास उठले तेव्हा, टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटाने विद्यार्थी वर्गाने त्यांचे स्वागत केले. यावेळी, डॉक्टरसाहेब अत्यंत प्रफुल्लित दिसत होते, एवढेच नव्हे, तर त्यांच्या चर्येवर विनोदपूर्ण लहरी दृग्गोच्चर होत होत्या. तब्बल एक तास, अस्खलितपणे, आवेशपूर्ण व सुस्पष्ट असे भाषण त्यांनी इंग्लिश भाषेत केले. त्यांच्या भाषणात, खुमासदार विनोद अधून मधून दरवळत होता, हा त्यांच्या भाषणातील विशेष होय. इतके उत्कृष्ट भाषण त्यांनी, दिल्लीच्या पार्लमेंटात देखील केले नसेल असा एकंदर श्रोत्यांचा अभिप्राय ऐकावयास मिळतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

चेअरमन आणि सभागृहातील सभासदहो, -

आज या ठिकाणी भाषण करण्याचे निमंत्रण तुम्ही मला दिलेत याबद्दल मी

तुमचा आभारी आहे. तुमच्या पार्लमेंटमध्ये येऊन मी हिंदू कोड बिलावर बोलावे अशी तुमची इच्छा आहे. परंतु असे भाषण करताना पार्लमेंटच्या नियमाची

अडचण उभी राहील हे मी जाणून होतो. मी काही तुमच्या पार्लमेंटचा

सभासद नाही. तेव्हा जो गृहस्थ या पार्लमेंटचा सभासद नाही त्यास या

जनता : १४ जानेवारी १९५०