२-५-१९५० बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान - Page 239

२६६
बौद्ध धर्मामुळेच भारत देश महान

दोन मे १९५० हा दिवस, भारतीय इतिहासात आणि विशेषतः अस्पृश्य जनतेच्या चळवळीत सुवर्ण अक्षराने कोरला जाईल. या दिवशी दिल्ली येथे भगवान बुद्धाची २४९४ वी जयंती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्य समाजाने जाहीरपणे साजरी केली.

सुमारे २२ वर्षापूर्वी अस्पृश्य समाजाने महाड येथे मनुस्मृतिचे जाहीर दहन केले होते आणि गुलामगिरीत डांबणाऱ्यां हिंदू धर्मात अस्पृश्य समाजाने राहू नये असा निश्चय जाहीर केला होता, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील बौद्ध जयंतीस विशेष महत्त्व प्राप्त होते यात शंका नाही

या बौद्ध जयंतीस जवळ जवळ २०,००० अस्पृश्य बंधु-भगिनींचा समुदाय हजर होता. निरनिराळ्या राष्ट्राचे परराष्ट्रीय वकील सदर समारंभास प्रामुख्याने दिसत होते. शिवाय बौद्धधर्मीय भिक्कुंचाही समुदाय खूपच होता.

याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले भाषण अत्यंत श्रवणीय आणि स्फोटक होते. त्यांच्या भाषणामुळे वृत्तपत्र सृष्टीत केवढी खळबळ उडाली हे सर्वांना माहीत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे ते खळबळजनक समग्र भाषण खालीलप्रमाणे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

सभ्यगृहस्थहो, भगिनींनो आणि बंधुनो,

याप्रसंगी मी हिंदी भाषेत बोलण्याचे ठरविले आहे. त्याबद्दल येथे हजर असलेल्या सन्माननीय पाहुण्यांची मी प्रथमतःच माफी मागतो. इंग्रजी भाषेत बोलण्याची माझी फार इच्छा होती. इंग्रजी भाषेत मी बोललो असतो तर माझ्या विदेशी मित्रांना माझे विचार ऐकता आले असते, परंतु इंग्रजी भाषा येथील बहुसंख्य श्रोतृवर्गास समजणार नाही. तेव्हा इंग्रजीमध्ये मी भाषण करणे म्हणजे शरोतू- वर्गावर अन्याय करण्यासारखेच आहे म्हणूनच मी हिंदीत बोलत आहे.

जनतः : १३ मे १९५०.