२०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे
वरचेवर जाहीर सभात जावे आणि या ना त्या विषयावर माहिती देत प्रवचने झोडावीत अशी .काही मला सवय भाही. `: मी दिल्लीला आल्यापासून फारच थोड्या सभांना हजर राहिलो आहे. जनतेचा वेळ विनाकारण घेऊ नये, असे मला वाटते आणि जर लोकांचा वेळ घेतलाच तर जनतेची नीती सुधारेल व त्यांना साहाय्यभूत होईल असे काही तरी सांगण्यासारखे आपल्याजवळ पाहिजे.
कांही दिवसांपूर्वी काही तरुणांनी माझा वाढदिवस साजरा करण्याची इच्छा दाखविली आणि त्या समारंभास मी हजर राहावे असे सांगितले. परंतु त्या गोष्टीस मी कबूली दिली नाही. त्यामुळे मी गैरहजर राहिल्याने पुष्कळांची निराशा झाली, असेल. मात्र त्यामुळे मला वाईट वादले नाही. .कारण माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचा वाढदिवस साजरा करून. कोणता फायदा मिळणार ? तुमच्यापेक्षा माझ्यामध्ये विशेष. असे काय आहे ? माझ्यापेक्षा तुमच्यामध्ये कमी माणुसकी आहे काय ? मला तसे मुळीच वाटत नाही. काही माणसांना आपले-वाढदिव्रस साजरे झालेले आवडत असतील, माझा वाढदिवस साजरा झालेला मला आवडत नाही. म्हणून मी त्या तरुणांमा' भगबान बुद्धाचा वाढदिवस साजरा करण्यास सांगितले आणि म्हणूनच माझी सर्व कामे बाजूला सारून मी आलो आहे
आपल्या. . देशातील लोक. देवपूजा करतात. आणि त्यांना रामजयंली कृष्णजयंती साजरी करण्यात मोठा आनंद वाटतो. राम, कृष्ण जयंतीस मी हजारो माणसे पाहतो; परंतु भगवान बुद्धाच्या जयंतीला जेमतेम १०० लोक देखील जमलेले मला कधी दिसले नाहीत. बुद्ध मंदिरामध्ये मी दरवर्षी जातो तेव्हा हा फरक मला दिसून येतो. रामाची अगर कृष्णाची जयंती लोक का साजरी करतात ? त्यांना वाटते की राम व कृष्ण हे देव आहेत. मी धर्मशास्त्राचा मोठा पंडित नाही, तथापि जे काही धार्मिक वाड्मय मी अभ्यासिले आहे त्यावरून हे सांगू इच्छितो की, देव पदास चढणारी व्यक्ती ही पवित्र विचारांची असावी लागते. अशा व्यक्तीने दुसऱ्याचा द्वेष करू नये, स्वार्थी हेतू बाळगू नयेत आणि वैरत्व कोणाशीही ठेवू नये. त्याजपासून कोणाचेही नुकसान होऊ नये
या कसोटीवर राम व कृष्ण खरोखरीच देव आहेत काय ? प्रथम रामाची छाननी करू. राम खरोखरच देव होता काय? दोन तीन कारणास्तव
रामाला देव मानता यावयाचे नाही.