अस्पृश्यांना बौद्ध धर्माशिवाय . . . . अभ्युदयाचा मार्ग नाही २१७
गेली ३५ वर्षे मी राजकीय लढाई चालविली आहे. या लढाईत मोठमोठ्या व उच्च हिंदुंच्या तरवारीबरोबर तरवार मला मिडवावी लागली. याच काळात, जगातील सर्व धर्मांचा मी अभ्यासही केला आणि आता शेवटी एका अपरिहार्य निर्णयास मी येऊन पोहोचलो आहे. तो निर्णय हाच की, बौद्ध धर्माशिवाय अस्पृश्यांना दुसरा कोणताही मुक्तिचा मार्ग नाही. फक्त बौद्ध धर्मातच अस्पृश्यतेच्या निवारणाचा चिरकालीन उपाय आहे. जर तुम्हास, समतेचे तत्त्व हवे असेल आणि आर्थिक दास्यातून मुक्तता करावयाची असेल तर बोद्धवादा- शिवाय कोठेच दुसरा आश्रय नाही.
सिलोनचे मान्यवर नागरिक बनण्याची संधी तुम्हास कायद्याने मिळालेली आहे. या कायद्यातील काही कलमांविरुद्ध तक्रार करण्यास पुष्कळ जागा आहे, हे खरे आहे. परंतु मला खात्री आहे की, भारत सरकार व सिलोन सरकार [यांच्या ] सलोख्याने व स्नेहभावाने अन्यायी तरतुदींचे निराकरण करता येईल.