२७२
संघटनेनेच राजकीय शक्ती [प्राप्त ] [होणार ] [आहे ]
दिनांक २१ जुलै १९५० शुक्रवार रोजी भारत सरकारचे कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनमाड मार्गाने औरंगाबाद येथे दुपारी दीड वाजता स्पेशल सलूनने आले. रोटेगाव-लासूर येथे डॉ. बाबासाहेबांचे असंख्य जनसमुदायाने मोठ्या आदराने व भक्तिभावाने स्वागत केले. स्टेशनवर पोलिसांनी सलामी (५३४५ ० H०n०७7) दिली.
जनसमुदायाचे अभिवादन
दिनांक २२ जुलै १९५० शनिवार रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे २,००१ रुपयांच्या थैली कार्यक्रमास हजर राहाणार ही वार्ता सर्व शहरात विद्युतवेगाने पसरली. दहा वाजल्यापासून हजारो पुरुष-स्त्रिया शहरातून व बाहेरून सभेच्या ठिकाणी येताना दिसत होते. बाबांचे दर्शन होणार व बाबांचे भाषणही ऐकावयास मिळणार म्हणून कित्येक स्त्रियांना लहान मुलांची आठवण राहिली नाही. साडे पाच वाजता मोटार येताच असंख्य ललनांनी दुरूनच बाबांना भक्तिभावाने ओवाळले तसेच पुष्पांचाही वर्षाव केला. शिस्त राखण्याच्या कामी मुनाजी लळिगकर व हं.शु. निकम, चाळिसगाव यांनी औरंगाबादच्या कार्यकर्त्यांना चांगली मदत केली.
श्री. कन्नडकर मोरे यांचे निवेदन
अखिल हैदराबाद स्टेट शेड्यूल्ड कास्ट्स् फेडरेशन, औरंगाबादच्या विद्यमाने श्री. बी. एस. मोरे कब्रडकर यांनी: आपल्या प्रास्ताविक भाषणात स्टेटमधील परिस्थिती त्रोटक शब्दात निवेदन करून दलित जनतेत स्वातंत्र्य, प्रेम व स्वाभिमान निर्माण करून दलित अस्पृश्यात माणुसकी निर्माण केल्याचे श्रेय सर्वस्वी डॉ. बाबासाहेबांनाच आहे असे सांगितले. किसान मजूर व अस्पृश्यांचा उद्धार डॉ. बाबासाहेबांशिवाय दुसऱ्याकडून होणार नाही याची परिपूर्ण कल्पना
जनता : ५ ऑगस्ट १९५०.