१५-११-१९५१ योजना कोणी केली ते पाहता ती कशी आहे ते पाहा - Page 313

योजना कोणी केली ते न पाहाता ती कशी आहे ते पाहा २७३

नदीचा उगम आणि ऋषीचे मूळ कोणी पाहात नाही. त्याचप्रमाणे आमच्या दलित फेडरेशनच्या कार्यक्रमाकडे, योजनेकडे पाहा. ही योजना कोणी केली ते न पाहाता ती योजना कशी आहे ते पाहा; इतर योजनांशी कसाला लावा आणि मग बोला, उगाच निंदा का करता ? |

काँग्रेसला आम्ही समाजवाद्यांशी संगनमत केले ह्याचे वाईट वाटते. त्यांना वाटते की सर्वांनी काँग्रेसचा पदर धरावा. समाजवाद्यांशी आम्ही संगनमत केले ह्यामुळे काय अनर्थ निर्माण झाला ते कळत नाही. काँग्रेसबाहेरील सर्व पक्षांची एकजूट करण्याचा माझा विचार होता; परंतु निवडणुकीस आता फारसा अवधी नसल्याने ते शक्‍य झालेले नाही. परंतु निवडणुकीनंतर मी त्या बाबतीत पुन्हा प्रयत्न करून पाहणार आहे. दोन पक्षातील योजनात आणि कार्यक्रमात जर फारशी विसंगती नसेल तर निवडणुकीच्या बाबतीत संगनमत केल्यास त्यात वाईट काय ? ह्याच भूमिकेवरून आम्ही हे संगनमत केले आहे. पूर्व आणि पश्चिमाभिमुख अशा दोन पक्षात सांगड करणे हे अप्रामाणिकपणाचे आहे परंतु एकाच दिशेने दोन माणसे जात असली तर त्यांनी काही मार्गापर्यंत एकत्र गेल्यास त्यात अप्रामाणिकपणा कसां होईल ? त्यात पाप काय आहे ? आजतंरीही

एकी निवडणुकीपुरती आहे.