१५-११-१९५१ योजना कोणी केली ते पाहता ती कशी आहे ते पाहा - Page 312

२७२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

पहिली म्हणजे नियोजन मात्र पार पडणार आहेत. ह्या योजनेतून दोन गोष्टी

कमिशनचे अध्यक्ष पंडित नेहरू हे प्रधानमंत्री या नात्याने एक सर्वाधिकारी बनणार आहेत. माझा स्वतःचा अनुभव आपणास सांगतो. प्रत्येक खात्यातील कामकाजावर आणि प्रत्येक खात्याच्या मंत्र्यावर पंडित नेहरू आपला ताबा ठेवू पाहतात. ते कोणालाही स्वतंत्रपणे काम करू देणार नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेमुळे लाचलुचपतीत अधिकच भर पडणार आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषांचा, ज्यांचे सरकारी अधिकाऱ्यांशी काम असते अशा सर्वांचा असा अनुभव आहे की लाच दिल्याखेरीज सरकारी अधिकाऱ्यांकडून काही काम होत नाही. ह्या पंचवार्षिक योजनेप्रमाणे एक लाख रुपयांहून अधिक भांडवल असणारा उद्योगधंदा सुरू करण्यास सरकारी अधिकाऱ्याची परवानगी लागणार आहे. ह्यामुळे लाचलुचपतीचे क्षेत्र हजारोपटीने वाढणार आहे. एकंदरीत पाहिले तर ह्या योजनेत आशा करण्यासारखे काही नाही.

जेव्हा आपल्या कार्याविषयी समाधानकारक असे काहीही एखाद्यास सांगता

येत नाही. तेव्हा तो दुसऱ्याबद्दल गैरसमज निर्माण करण्यासाठी, दुसऱ्याची

निंदा करण्यासाठी सर्व शक्‍य ते प्रयत्न करतो. काकासाहेबांचे शेवटी तसेच झाले. दलित फेडरेशन आणि समाजवादी यांचा जो निवडणूक करार झाला आहे त्यावर गरळ ओकण्याचा त्यांनी अखेर प्रयत्न केला. दलित फेडरेशन ही जातीय संस्था आहे आणि आपण कधीही कोणत्याही जातीय संस्थेशी सहकार्य करणार नाही असे म्हणणाऱ्या समाजवाद्यांनी ह्या जातीय संस्थेशी सहकार्य का केले, असा प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. काही पक्ष जातीय आहेत; काही नाही. असा काँग्रेसवाल्यांचा दावा आहे. दलित फेडरेशन ही जातीय संस्था आहे, असा प्रचार १९२० पासून कॉंग्रेसकडून चालू आहे. फक्त काँग्रेस तेवढी जातीय नाही, असा काँग्रेसचा दावा आहे. काँग्रेस पुढाऱ्यास माझा असा सवाल आहे की काँग्रेस पुढाऱ्यांनी जातीभेद बाजूस टाकला आहे का ? सहभोजन, सहविवाह काँग्रेस पुढाऱ्यांनी कृतीत आणला आहे का ? काकासाहेबांनी आपल्या कन्येच्या विवाहासाठी उच्चकुलीन सरदार पुत्रच निवडला ना ? अधिकाराच्या जागांवर नेमताना आपापल्या जातीकडेच पाहण्याची प्रवृत्ती काँग्रेस पुढाऱ्यात फारच प्रकर्षाने दिसते. आम्हा अस्पृश्य जमातीत हजारो जाती आहेत पण जातीभेद मोडण्याचा आम्ही जसा प्रयत्न केला आणि करीत आहोत तसा काँग्रेस पुढाऱ्यांनी केला आहे का? केवळ जातभाईची भरती करणे हेच आज आपणास दिसते. मला कॉँग्रेसचा विरोध का, तर मी जातीचा महार आहे म्हणून.