२८५
सत्तेवर येणाऱ्या कोणाही पक्षाला, जनतेच्या
सर्वागीण हितासाठी जोतीबा फल्यांचे
धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान
घेऊनच पुढे जावे लागेल
जनता, दिनांक १७ नोव्हेंबर १९५१ मध्ये जाहीर केल्यानुसार डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांचा मनमाड व नाशिक येथील सभेचा कार्यक्रम आयोजित करण्यात
आला. त्यानुसार त्यांच्या नाशिक येथील सभेच्या कार्यक्रमाला दिनांक १७
नोव्हेंबर १९५१ रोजी. संध्याकाळी ६ वाजता सुरूवात झाली. त्याप्रसंगी ते
आपल्या भाषणात म्हणाले ॒
भगिनींनो आणि बंधुजनहो,
माझे मित्र श्री. भाऊराव गायकवाड ह्यांनी मी आपणास दोन शब्द सांगावे अशी
मला विनंती केली. निवडणुकीचा हा माझा दौरा असल्याने मी आपणास
निवडणुकीसंबंधानेच काहीतरी सांगणार. ह्या भागातफॅ उभे असलेल्या
फेडरेशनच्या आणि समाजवादी पक्षाच्या उमेदवारांनाच आपण निवडून द्यावे हीच
माझी आपणास विनंती आहे.
ह्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव करणे अगदीच अशक्य आहे असे
नाही. काँग्रेसबाबत जनतेत किती असंतोष पसरलेला आहे हे सर्वांना माहीत
आहेच. स्वतंत्र विचाराचे नागरिक काँग्रेसला परवडत नाहीत, काँग्रेसला केवळ
बंदे लोक पाहिजेत. ज्यांना ते पटत नाही ते काँग्रेसमधून बाहेर पडतात. आज
देशात जे अनेक पक्ष आहेत त्यात जनतेला अत्यंत अप्रिय झालेला असा
काँग्रेससारखा दुसरा कोणताही पक्ष नाही.
तरीही ह्या निवडणुकीत काँग्रेस कदाचित यशस्वी होइल अशी भीती मला
वाटते आणि त्याचे कारण एकच आणि ते म्हणजे आज काँग्रेसविरोधी गटात एकवाक्यता नाही. अनेक पक्ष आहेत आणि त्या प्रत्येक पक्षाने आपापले उमेदवार उभे केले आहेत. हे उमेदवार आपापसात झगडतील आणि त्यायोगे काँग्रेसविरोधी शक्तीचे बळ कमी होईल आणि त्यामुळेच कॉँग्रेसचा {मिय होईल.