१७-११-१९५१ सत्तेवर कोणत्याही पक्षाला जनतेच्या सर्वागीण हितासाठी जोतीबा फुल्यांचे धोरण आणि लोकशाहीवादी तत्त्वज्ञान घेऊनच पुढे जावे लागेल - Page 316

|

]

२७६ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

काँग्रेसविरोधी सर्व पक्षांची एकजूट करून एका मतदार संघातून काँग्रेसविरोधी एकच उमेदवार उभा राहावा अशी माझी इच्छा होती. परंतु निवडणुकीस फारच कमी अवधी राहिला असल्याने माझे त्याबाबतीत प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत. तथापि ज्या पक्षात जास्त प्रमाणावर एकवाक्यता आहे अशा पक्षांची निवडणुकीपुरती एकजूट आणावी ह्या हेतूनेच फेडरेशनने समाजवादी पक्षाशी निवडणूक करार केला आहे. आपणास माहीत आहेच की आपणास पंढरपूरास जावयाचे असेल तर अनेक मार्ग आहेत; सर्वांना एकाच मार्गाने जाणे शक्य नसते. काहींचा असा विशवास असतो की अमुक मार्गाने गेलो तरच आपणास वैकुंठ प्राप्त होईल. अजून आपणास राजकारणाचा मिळावा तसा अनुभव मिळालेला नाही. जेव्हा तो अनुभव येईल तेव्हा सर्व पक्ष एकत्रित येऊन मार्गाची विचक्षणा करतील आणि त्यातूनच आपणास काँग्रेसविरोधी पक्षांची एकजूट दृष्टीस पडेल. आज मात्र प्रत्येकास आपला मार्ग खरा असे वाटत आहे अशा परिस्थितीत मार्गाकडे जास्त लक्ष न देता कोणत्या दिशेने जावयाचे आहे ते पाहून त्या दिशेने जाणाऱ्या इतरांशी हातात हात घालून रस्ता काढला तर त्यात कोणाची दिशाभूल केल्यासारखेही होणार नाही अगर कोणावर अप्रामाणिकपणाचा आरोपही. लादता येणार नाही.

ह्या दृष्टीनेच फेडरेशन आणि समाजवादी पक्ष ह्यांनी हा निवडणूक करार केलेला आहे. आम्हा दोघांमध्ये काही बाबतीत मतभिन्नता आहे. पण आम्हा दोघांचीही दिशा मात्र एकच आहे. वरिष्ठ वर्गाचे दडपणातून जनतेस खरे स्वातंत्र्य मिळवून देणे ह्याबाबत आमच्यात एकमत आहे. तेव्हा सर्वच बाबतीत एकमत नसले तरी उभयतांनी एकदिलाने, संघटितपणे ह्या लढाईस तोंड देणै शक्य आहे असे आम्हा दोघासही पटल्यानेच आम्ही ही निवडणूक संयुक्तपणे लढवीत आहोत.

मला असा प्रश्‍न विचारण्यात आला की, महाराष्ट्रातील शेतकरी कामगार पक्षाशी तुम्ही करार का केला नाही ? मी अजूनपर्यंत ह्याबाबत जाहीरपणे कोठे बोललो नव्हतो, आज मी ह्या प्रश्‍नाचे उत्तर देणार आहे. पूर्वी ब्राह्मणेतर पक्ष अस्तित्वात होता. आपल्या प्रांतातच नव्हे तर मध्यप्रांत, वऱ्हाड, मद्रास येथेही असा पक्ष अस्तित्वात होता. म. जोतीबा फुले ह्यांनी ह्या पक्षाची मुहूर्तमेढ रोविली, म्हणून ह्या पक्षाचे अनुयायी आपणास जोतीबा फुले यांचे अनुयायी म्हणवू.