२५-११-१९५१ लोकशाहीत विरोधी पक्षाची फार आवश्यकता असते - Page 329

२८८
लोकशाहीत विरोधी पक्षाची
फार आवश्यकता असते

'रविवार तारीख २५ नोव्हेंबर १९५१ रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क, मुंबई येथे शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशन आणि समाजवादी पक्षाच्या वतीने निवडणूक प्रचाराची जंगी सभा होणार आहे. सभेत प. पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व साथी अशोक मेहता यांची भाषणे होतील. तत्पूर्वी भायखळ्यापासून प्रचंड मिरवणूक निघेल. तीत सर्वांनी सामील व्हावे. असे पत्रक ज. ग. भातनकर, जनरल सेक्रेटरी, मुंबई दलित फेडरेशन शाखा, यांच्या नावाने जनतेच्या २४ नोव्हेंबर १९५१ च्या अंकात प्रसिद्ध झाले होते. सभेत किमान दोन लाख जनसमुदाय हजर असावा.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या भाषणात म्हणाले,

पंडित नेहरूंनी परवाच्या भाषणात माझ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यासंबंधी बोलणे अप्रस्तुत होणार नाही. मी काँग्रेसवर ज्या प्रकारची टीका करतो तीच टीका मी माझ्या राजीनाम्याच्या पत्रात केली आहे. नेहरूंनी गेल्या कित्येक दिवसात माझ्या टीकेला उत्तर देण्याचा प्रयत्न केला नाही. लोकसभेतसुद्धा मी निघून गेल्यानंतर सायंकाळी ६ वाजता [त्यांनी ] त्यांचा व माझा केवळ पत्रव्यवहार वाचून दाखविला. माझ्या आरोपांचे निरसन केले नाही. ठिकठिकाणी आपल्या दौऱ्यातसुद्धा त्यांनी त्यासंबंधी खुलासा [केला ] नाही. बरे परवाच्या भाषणात तरी त्यांनी काय सांगितले ?

माझे काँग्रेसवर मुख्यतः दोन आरोप आहेत. एक असा की कॉग्रेस सरकारने हरिजमांच्या उन्नतीसाठी काही कार्य केले नाही. पंडित नेहरूंनी सांगितले की, माझे म्हणणे खोटे आहे. पण हा मताचा प्रश्‍न नाही. वास्तविकतेचा

आहे. पंडित नेहरूच केवळ सत्यवक्ते आहेत आणि दुसरे नाहीत असे जग

मानीत नाही. निदान मी तरी तसे मानीत नाही. माझे म्हणणे नेहरूंना फक्त

एकाच तऱ्हेने खोडून काढता आले असते आणि ते म्हणजे त्यांनी आपल्या

सरकारने हरिजनांसाठी काय केले आहे याची समग्र वस्तुस्थिती निदर्शक माहिती

जनता : १ आणि ८ डिसेंबर १९५१.