३१-५-१९५२ अधिकारारूढ पक्षाशी माझी मतभेद असले तरी देशाची नाचक्की कधीही करणार नाही - Page 348

३०८ डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकेत सत्कार

कोलंबिया विश्‍वविद्यालयाचा पदवीदान समारंभ तारीख ६ जून रोजी न्यूयॉर्क येथे झाला. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना एलएल. डी. पदवी बहाल करण्यात आली.

कोलंबिया विश्‍वविद्यालयाचे ६ हजार आठशे अठ्ठेचाळीस पदवीधर होते. हे सतरा शाळा व कॉलेजातील विद्यार्थी होते. डॉ. बाबासाहेबांबरोबर कॅनडा ` सरकारच्या परराष्ट्राच्या कारभाराचे सेक्रेटरी श्री. पीवरसन आणि श्री. डॅनियल मॉकेंट फ्रान्सचे सुप्रसिद्ध वाङ्मय इतिहासकार यांचाही गौरव करण्यात आला. याशिवाय आणखी आठ अमेरिकन नागरिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शेकडो लोक हजर होते. विश्‍वविद्यालयाला अस्तित्वात राहून एकशेंअङ्क्याण्णव वर्षे झाली. . अशा सुप्रसंगी डॉ. बाबासाहेबांना खास बोलावून त्यांचे थाटाने स्वागत करण्यात आले. " भारताचे एक प्रमुख नागरिक सुप्रसिद्ध समाजसुधारक व मानवी हक्कांसाठी झगडणारे वीर'' असा त्याना पदवी देताना गौरव करण्यात आला, तेव्हा लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला." १

“ डॉक्टर ऑफ लॉज या पदवीचे “ सायटेशन " लॅटिन व इंग्रजी या दोन्ही भाषेत होते. हे '' सायटेशन “ ५ जूनला युनिव्हर्सिटीचे ” व्हॉईस प्रेसिडेंट अँण्ड प्रोव्होस्ट “ ग्रेसन कर्क यांनी समारंभाच्या भव्य सभामंडपात वाचून दाखविले ते असे :

CITATION

“ COLUMBIA UNIVERSITY IN THE CITY OF NEW YORK

BHIMRAO RAMJI AMBEDKAR, LL. D.

Born in India and schooled there under heavy hardships; B.A. of the University of Bombay at twenty and for three years a graduate student in this University, receiving the doctorate in political science, Subsequently a student of the Inns of Court and the University of London obtaining a doctorate in economics; for the past three decades as barrister, University professor and member of the legislative council, as a framer of the Constitution, member of the cabinet and of the Council of State, one of India’s leading citizens, a great social reformer and 3 valiant upholder of human rights.

' जनता : ७ जून १९५२.