. . अधिकारारूढ पक्षाशी माझे . . . . कधीही करणार नाही ३०७
खरे चित्र रेखाटीन. त्या लोकांना मी सांगू इच्छितो की, अधिकारारूढ पक्षाशी व अधिकारावरील गृहस्थांशी माझे मतभेद असले तरी मी त्याकरता
देशाची नाचक्की कधीही करणार नाही. समोरासमोर मी मंत्र्यांशी किंवा सरकार
पक्षीय सभासदांशी दोनं हात करीन. पण परकीयांदेखत किंवा परदेशात त्यांचा |
मानभंग करणार नाही. '
गांधीजींच्याबरोबर मी गोलमेज परिषदेस हजर होतो. देशाचे हित जपण्याबाबत मी त्यांचेही पुढे २०० मैल होतो हे सांगू इच्छितो
"ता. ३१-५-१९५२ रोजी टी. डब्ल्यू. ए. च्या विमानाने ते जाणार होते. मुंबईच्या शे. का. फेडरेशनच्या कार्यकारिणीने त्यांना प्रेमाचा निरोप देण्याकरिता म्हणून एक जाहीर पत्रक काढले होते आणि ते पत्रक सर्व मुंबईभर वाटण्यात आले. त्याचप्रमाणे समता सैनिक दलाने 'सलामी' देण्याचे ठरविले. या दिवशी अकरा वाजता विमानतळावर दुतर्फा रांग. करून सैनिक उभे होते. पत्रकाला अनुसरून हजारो लोक हार तुरे घेऊन बाबासाहेबांचे दर्शन घेण्यासाठी व हार घालण्यासाठी सैनिकांचे मागे उभे होते.
बाबासाहेबाना निरोप देण्यासाठी अनेक जिल्ह्यातील अनेक पुढारी हजर होते त्यात श्री. आर. आर. भोळे (पुणे), श्री. आर. जी. खंडाळे (दौंड), श्री. दादासाहेब शिर्के (कोल्हापूर), कु. शांताबाई दाणी (नाशिक), श्री. पी. टी. मधाळे (द. सातारा)
श्री. पी. जे. रोहम (नगर), श्री. एस. बी. बाबर, श्री. एन्. एस्. कांबळे (सोलापूर)
श्री. जी. एम. शेंदूर्नीकर (पू. खानदेश), श्री. आंबाभाई परमार (खेडा),
श्री. पी. एंम. पटणी (अहमदाबाद), श्री. जी. टी. रुपवते (नगर), [श्री. ] [ए. ] [जी. ] [पवार ]
(नाशिक), श्री. के. आर. जाधव (सॉलापूर), [तसेच ] [श्री. ] [बी. ] [सी. ] [कांबळे, ]
(एम्. एल. ए.), श्री. जी. के माने, [श्री. ] आर. [जी. ] [भंडारे, ] [श्री. ] [जी. ] [एन्. ] [बाबरीया ]
व श्री. भाऊसाहेब आंबेडकर खास [निरोप ] [द्यायला ] [हजर ] [होते. ]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सौ. माईसाहेबांसमवेत बरोबर साडेदहा वाजता
विमानतळावर येताच लोकांनी टाळया वाजवून ' जयभीम ' गर्जना केली. त्यांना
प्रत्येक संस्थेतर्फे हार तुरे झाले. त्यापूर्वी श्री. ससाळेकर जी. ओ. सी.
यांनी प्रथम सलामी दिल्यावर सैनिकांनी ' गार्ड ऑफ ऑनर ' दिला. नंतर
डॉ. बाबासाहेबांनी आपल्या स्नेही मंडळी व इतर उपस्थित मंडळीबरोबर चर्चा
केली. डॉ. बाबासाहेब आनंदी दिसत होते.
बरोबर पावणे दोन वाजता ' ठी. डब्ल्यू. ए. ' चे अधिकारी त्यांना घेऊन
विमानाकडे गेले. लोकांनी परत एकदा ' आंबेडकर झिंदाबाद ' ' जयभीम '
असा जयघोष केला. डॉ. बाबासाहेबांनी फिरून एकदा साऱ्यांना नमस्कार ' केला. बरोबर दोन वाजता विमान निघाले.
000 SPST SS य ्व ्
` १ डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्र : चां. भ. खैरमोडे, खंड १० वा, पृ. २८३, २८४ आणि २८६.