स्त्रियांनी आपल्या हक्कांसाठी . . . . पुढे आले पाहिजे ३४३
होतच नाहीत याचे कारण तेथे स्त्रीलाही वारसा हक्क आहे. त्यामुळेच पुरूष तिच्याशी चांगल्या प्रकारे वागतो. म्हणून पुरूषांप्रमाणेच आपल्यालाही वारसा हक्क मिळावा यासाठी स्त्रियांनी चळवळ सुरू करावी, घरात बसून किवा समा, संमेलने व ठराव करून या गोष्टी होणार नाहीत. त्यासाठी स्त्रियांनी स्वतः
चळवळ करण्यास पुढे यावे. |
हिंदु. कोड बिलाची मुहूर्तमेढ १९३९ साली रोवली गेली व तेव्हापासून गेली अकरा वर्षे त्या बिलाच्या स्वरूपावर चर्चा चालू असताना पुनः त्या बिलाचे विभाग पाडून जनतेपुढे त्याच्या वावड्या का उडविल्या जात आहेत हे समजत नाही.
आपण येणाऱ्या बिलातील प्रत्येक कलम नीट तपासून पाहा. निव्वळ आंतरजातीय विवाहाचे कलम पाहून चालणार नाही. तेवढेच कलम नवे व बाकीचे कायदे जुनेच राहिले तर अनर्थ ओढवतील. आंतरजातीत स्त्री-पुरुषापासून झालेल्या संततीस आपल्या जुन्या शास्त्राप्रमाणे संपत्तीची मालकी मिळत नाही, म्हणून अशी संतती कायदेशीर ठरवून तिला मालकी देण्याची तरतूदही [कायद्यात ] करून घेतली पाहिजे.
या बिलासाठी स्त्रियांना कळकळीचा पुन्हा एकवार आदेश देऊन त्यांनी आपले भाषण संपविले.
शेवटी सौ. उर्मिलाबाई सबनीस यांनी आभारप्रदर्शन करून ज्या छत्रपती ताराबाईने करवीर राज्य स्थापन केले, त्या करवीरच्या महिला चळवळीत
आघाडीवर राहातील असे सांगितले.