(???) भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे - Page 385

३०३
भारतात प्रत्येक खेड्यात दक्षिण आफ्रिका आहे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिनांक २५ डिसेंबर १९५२ रोजी निपाणी (जिल्हा बेळगाव) येथे दक्षिण महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असताना भेट दिली.

तेथील सभेला संबोधित करताना ते म्हणाले,

भगिनींनो आणि बंधुंनो,

दक्षिण महाराष्ट्रात दौऱ्यावर येण्याचे बऱ्याच दिवसात घाटता घाटता आज तो योग आला. मी तुमच्या भागात आलो किंवा न आलो याबद्दल तुम्ही दिलगीर असता कामा नये. मी कुठेही असलो तरी आपल्या भोवतीचा आपल्या प्रश्‍नाचा

आपणच कळकळीने विचार केला पाहिजे. कारण आपले प्रश्‍न स्वतःलाच

अधिक तातडीने सोडवता येतात.

१८८५ साली काँग्रेस स्थापन झाली. पण आम्ही काँग्रेसच्या चळवळीपासून चार पावले दूरच राहिलो. कारण ही चळवळ आमच्यावर सामाजिक गुलामगिरी लादणाऱ्या ब्राह्मणवर्गाची होती. काँग्रेसची ही संघटना ब्राह्मणांचीच संघटना होती हे आम्हाला कळून चुकले होते आणि पेशवाईतील ब्राह्मणांची नीती आम्हाला चांगलीच ज्ञात आहे. पगड्या पाहून निवाडा करणाऱ्या या समाजसुधारकात आम्ही शिरलो असतो तर आम्हाला यांनी ओसरीच दिली असती. दिवाणखान्यात शिरता आले नसते. काँग्रेसला स्वराज्य हवे होते ते ब्रिटिश आमदानीत हरवलेले आपले स्वत्व टिकविण्यासाठी ! पणमराठेसुद्धा त्यावेळी काँग्रेसच्या चळवळीत नव्हते. काँग्रेस ब्राह्मणांची होती तेव्हा त्याकाळचे मराठा पुढारी घाबरले होते. आमचे कसे होईल अशी त्यांना भीती होती. त्यांनी एक परिषद बोलावून आपल्या मराठा वर्गाला राखीव जागा द्याव्यात अशी मागणी केली. त्याप्रमाणे त्यांना ७ जागा राखीव मिळाल्या. त्यांनी सर्व ब्राह्मणेतरांची एक संघटना केली. पुढे हे सर्व ब्राह्मणेतर आपणाला सोडून काँग्रेसमध्ये शिरले. कारण गांधीजींनी ही मूस फोडून टाकिली व मराठा पुढाऱ्यांना आमिषे दाखविली. त्या आमिषांना भाळून

ते काँग्रेसमध्ये शिरले.

जनता : ३ जानेवारी १९५३.