- ३०५
बुद्ध तत्त्वज्ञानामुळे जग युद्धापासून दूर
व शांततेच्या जवळ जाईल
नवी दिल्ली येथे रविवार तारीख १५ फेब्रुवारी १९५३ रोजी इंडोजपानी सांस्कृतिक संघटनेचे चिटणीस श्री. मूर्ती व त्यांच्या पत्नी यांचा श्री. राजभोज यांनी सत्कार केला. या सत्काराला पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सौ. माईसाहेब आंबेडकर, रोहिणीकुमार चौधरी, ज. भोसले, आमदार कृष्णा व इतर पंधरा-वीस आमदार हजर होते. या'प्रसंगी भाषण करताना श्री. बापूसाहेब राजभोज यांनी जपानमधील आपल्या दौऱ्याची थोडक्यात हकीकत सांगितली व तेथे बौद्धधर्माच्या विकासाचे आपल्याला जे दर्शन घडले त्याचेही वर्णन केले. श्री. मूर्ती व त्यांची संघटना यांचे आपल्याला अनमोल सहाय्य झाले याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त
केली.
यावेळी पूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक छोटेसे व विचार परिप्लुत असे भाषण केले. ते म्हणाले,
जगापुढे विशेषतः आशिया खंडापुढे आज दोनच मार्ग उपलब्ध आहेत. एक बुद्धाचा मार्ग व दुसरा मार्क्सचा मार्ग. बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा वेळीच जगाने स्वीकार केला नाही तर, कम्युनिस्ट तत्त्वज्ञानाचा विजय होणे अपरिहार्य आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान हाच जगाला एकमेव आधार आहे व त्याचा जेवढा प्रचार होईल तेवढे जग युद्धापासून दूर व शांततेच्या नजिक जाईल.
पूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या भाषणाचा तेथे जमलेल्या लोकांवर अत्यंत परिणाम झाला व बौद्ध तत्त्वज्ञानाबद्दल एक नवीनच दृष्टी घेऊन त्यांच्यापैकी काहीजण बाहेर पडले.
७००७
ooo
जनता : १४ मार्च १९५३.
नि {वादी ४११-२५४ __