७-१९५३ आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे - Page 405

आपल्या कार्यकर्त्याने राजकीय, . .. . अभ्यास केला पाहिजे ३६५

नाहीत, त्यांनी लोकांचे काम केले नाही तर त्यांना काढून टाकण्यास मी मुळीच घाबरणार नाही. . म्हणून प्रत्येक विभागात निदान वर्षातून एक तरी परिषद घेतली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे सभा, स्नेहसंमेलने, चर्चामंडळे, कॅम्पस्‌ ` वगैरे घेतले पाहिजेत. म्हणजे आपले कार्यकर्ते वेळोवेळी एके ठिकाणी येतील, चळवळीचा अभ्यास करतील आणि कार्य जोमात होईल.

शेवटी मला सांगावयाचे आहे की मी व्यक्तीशः: कोणत्याही कार्यकर्त्यावर प्रेम करीत नाही. प्रेम फक्त कार्यावरच असते. जो कार्य करील तोच फक्त मला आवडतो.