२४-१-१९५४ खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुन:स्थापना करण्याचे बिकट कार्या भावी पिढीवर येऊन पडले आहे - Page 408

३१३
खर्‍या आणि श्रेष्ठ धर्माची पुनःस्थापना करण्याचे
बिकट कार्य भावी पिढीवर येऊन पडले आहे

दिनांक २४ जानेवारी १९५४ रोजी अखिल भारतीय साई भक्त संमेलनाचे मुंबई येथील झेवियर कॉलेजच्या मैदानावर उद्घाटन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले,

आज तर मूर्तिपूजा, साधुसंत आणि चमत्कार करणाऱ्या व्यक्तींची पूजा हाच धर्म होऊन बसला आहे. आपल्या धर्मात आता देव आणि नीतीही राहिली नाही. आजची अवस्था म्हणजे मानवी मनाचा संपूर्ण अधःपात आहे. म्हणूनच खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुनः स्थापना करण्याचे बिकट कार्य भावी पिढीवर येऊन पडले आहे.

साईबाबांना प्रत्यक्ष भेटण्याचे किंवा पाहाण्याचे भाग्य मला लाभले नाही. त्यांच्याबद्दल मी थोडे फार ऐकून आहे एवढेच. म्हणून अशावेळी साईबाबांच्या जीवनाचे अष्टपैलू माहित असलेल्या व्यक्तिला बोलाविले असते तर फार बरे झाले असते. माझे साईबाबांबद्दलचे ज्ञान अगदी शून्य आहे आणि जे आहे त्याचे अधिष्ठान देखील ऐकीव गोष्टीवरच आहे. साईबाबा कालवश होऊन बरेच दिवस लोटले असले तरी त्यांचा भक्तगण मात्र इंदुकलेप्रमाणे सारखा वाढत आहे. साईबाबा हे धर्मगुरू म्हणूनच पुष्कळांना माहीत आहेत. हिंदुस्थानात धर्माची अनेक स्थित्यंतरे झाली. माणसाच्या आत्म्याला मुक्ती मिळण्याचे साधन हीच धर्माची प्राथमिक अवस्था अशी समजूत होती. कालांतराने धार्मिक दृष्टिकोन, हेतू आणि साधना यामुळे मूळ कल्पनेत आमूलाग्र बदल झाला आणि धर्म हा नेतिक मूल्यांनी परस्पराविषयी आदर भाव निर्माण करून विश्‍वबंधुत्वाची उभारणी करण्याचे साधन आहे असाही अर्थ लावला गेला. धर्माची तिसरी अवस्था म्हणजे मानवी जीवनातील दैनंदिन गरजांची जी व्यक्ती पूर्तता करील तिची देवाप्रमाणे पूजा करणे ही होय. कुणाला मुले हवी होती, कुणाला सोने हवे होते, कुणाला संकटमुक्त व्हायला पाहिजे होते ! ज्या व्यक्तीने या इच्छा पूर्ण

जनता : ३० जानेवारी १९५४.