२४-१-१९५४ खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची पुन:स्थापना करण्याचे बिकट कार्या भावी पिढीवर येऊन पडले आहे - Page 409

खऱ्या आणि श्रेष्ठ धर्माची . . . . भावी पिढीवर येऊन पडले आहे ३६९

केल्या ती व्यक्ति त्या त्या इसमांचा देव होऊन बसली. त्यानंतर तर सामान्य माणसापेक्षा काही तरी चमत्कृती करून दाखविणाऱ्या व्यविंतचीही पूजा होऊ लागल्याचे सर्व हिंदुस्थानभर आपण पाहात आहोत.

धर्माच्या बाबतीत आपण चुकीच्या मार्गाने गेलो आहोत, एवढेच नव्हे तर आजकालच्या काळात धर्माच्या नावावर पैसा गोळा करून तो अनिष्ट बाबींवर खर्च केला जातो. आज जगात दारिद्र्य आणि दुःख असताना अशारितीने धर्माच्या नावावर पैसा जमवून तो ब्राह्मणादी आणि उत्सवावर खर्च करणे हा एक भयंकर गुन्हा आहे. गौतम बुद्धांनी हा प्रश्‍न व्यवस्थितपणे हाताळला होता. त्यांनी आपल्या नैतिक शास्त्रात पंचशील, अष्टांगमार्ग आणि निर्वाण फार उत्कृष्ट रीतीने सांगितले आहेत. याशिवाय त्यांनी आपल्या अनुयायांना खालील दहा तत्त्वे आत्मसात करण्यास सांगितली आहेत. ती अशी: (१) प्रज्ञा (२) शील, (३) नेखम्म, (४) दान, (५) वीर्य, (६) खन्ति, (७). सच्च, (८) अधित्थान, (९) मैत्री, (१०) उपेख्खा. |

ज्यामुळे अज्ञानांधकार नाहिसा होतो ती प्रज्ञा म्हणजे ज्ञानरूपी प्रकाश; शील म्हणजे नैतिक विचार; कोणतीही वाईट गोष्ट करू नये परंतु चांगली गोष्ट मात्र सतत करीत राहावे. नेखम्म म्हणजे ऐहिक सुखापासून अलिप्त राहाणे. दान म्हणजे कोणत्याही प्रकारची अपेक्षा न करता दुसऱ्यासाठी तनमनधन अर्पण करणे. वीर्य म्हणजे धैर्य, कसोटी की ज्यामुळे हाती घेतलेल्या कामात कधी माघार न घेणे. खन्ति म्हणजे सहनशीलता. द्वेषाला द्वेषाने उत्तर न देणे. सच्च म्हणजे सत्य. प्रत्येकाने खोटे कधी बोलू नये, सत्य बोलावे. जे बोलावे ते सत्यच असावे. अधित्थान म्हणजे मनोनिग्रह. मैत्री म्हणजे प्रेम, मग ती मित्राविषयी असो किंवा शत्रूविषयी असो, मानवाविषयी [असो ] [किंवा ] [इतर ] प्राणीमात्राविषयी असो. उपेख्खा म्हणजे उपेक्षा; ज्यामुळे मन सुखदुःखाच्या पलिकडे गेले असून कोणत्याही परिणामाने विचलित न [होता ] [कर्तव्यपरायण ] राहाणे. वरीलपैकी जास्तीत जास्त गुण प्रत्येक माणसाने आत्मसात [करावे ] अशी बुद्धाची अपेक्षा होती. म्हणूनच पाली वाङ्मयात असे म्हटले आहे की गौतम बुद्धांनी वरीलप्रमाणे ” दान पारमिता “ जरी शिकविली असली तरी दान हे सतपात्री असण्याबद्दल [त्यांचा ] [कटाक्ष ] [होताच. ] दान देण्यासाठी दाता जरी प्रवृत्त झाला तरी त्यामुळे ज्याला [दान ] [दिले ] [जाते ] [त्याला ] [मात्र ] [त्याने ] [कमीपणा ] [येता ] कामा नयें. पददलितांना एक दिवस [स्वतःच्या ] [पायावर ] [उभे ] [राहाण्यास ] [सामर्थ्य ] निर्माण करणारी शक्ति, जिला आपण [मदत ] [म्हणतो ] [तेच ] [खरे ] [दान. ] साघुसंतांच्या नावावर पैसा जमा केला असेल [तर ] [त्याचा ] [पारमितामध्ये ] [सांगितलेल्या ] [तत्त्वाप्रमाणे ]