२५-४-१९५४ दीपमालेतील न विझणाऱ्या दिव्याप्रमाणे, आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील - Page 426

आणि भाषणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन ३८६

राजा आहे. तो एखाद्या व्यक्तिला घेऊन न्यायाधिशाकडे जातो व त्याच्याबद्दल शिफारस करतो. त्याने नाही ऐकले तर तो मिनिस्टरपर्यंत पोहोचतो. जर न्यायाधीश प्रामाणिक असेल तर बिचाऱ्याच्या नोकरीवरून पाणीच फिरले म्हणून

समजा.

या साऱ्याचं कारण एकच. या देशात राज्यकर्त्या पक्षाला बंधन घालणारा दुसरा मजबूत पक्ष नाही. अशीच परिस्थिती चालू राहिली तर येथे जर्मनीप्रमाणे हिटलरशाही अथवा रशियाची स्टॅलिनशाही आल्याशिवाय राहणार नाही. याकरिता आम्ही अल्पसंख्य असूनही विरोधाचा अग्नी तेवत ठेवू. या कार्यात इतरांचे सहकार्य मिळो वा न मिळो. केव्हाना केव्हा आमची मनोभावना, कार्यशक्ती याचा इतरांवर परिणाम होऊन ते आमचे ऐकतील. ज्याप्रमाणे एखाद्या दीपमालेतील सर्व दिवे विझले पण एकच पणती मिणमिणत राहिली तरी पण तीच साऱ्यांना मार्गदर्शन करते. त्याचप्रमाणे आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील.

इलेक्शन ही क्रिकेटची मॅच आहे. क्रिकेटमध्ये पराभव झालेली टीम गाशा गुंडाळून स्वस्थ बसत नाही. ती पुन्हा दुसऱया वर्षी नव्या जोमाने खेळावयास प्रारंभ करते... असाच आशावाद आपण ठेवला पाहिजे. दोन वर्षापूर्वी लखनौला भाषण देताना काँग्रेस हे जळते घर आहे, असे मी सांगितले होते. याचे तुम्हाला प्रत्यंतर आलेच असेल. आता या घराचे फक्त आढे जे नेहरू तेच उरले आहे, तेही थोड्याच दिवसात जळून जाईल. आपल्याजवळ आर्थिक बल

नाही. फक्त राजकीय. सामर्थ्य आहे. शरण जाणे माणसाला शोभत नाही. प्रसंगात माणूस शरण जातो पण पुन्हा तलवार हाती घेतो. आपली स्थिती यापुढे १९५२ च्या निवडणुकाप्रमाणे होणार नाही. मनुष्य कितीही दीर्घायुषी असला तरी त्याला उतरती कळा लागणारच. पण आपला मग उत्कर्षच होणार आहे. म्हणून संघटना मजबूत करा हेच माझे नेहमीचे निक्षून

सांगणे आहे.