२५-४-१९५४ दीपमालेतील न विझणाऱ्या दिव्याप्रमाणे, आमचा पक्ष लहान असूनही इतर पक्षांना मार्गदर्शन करील - Page 425

जल्या ‘~ > दीपमालेतील न विझणाऱ्या . . . . इतर पक्षांना मार्गदर्शन करील ३८५

या प्रसंगी शेड्यूल्ड कास्ट्स्‌ फेडरेशनचे कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेबांचे

| चहाते यांनी पाच हजार रुपयांची थैली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अर्पण

केली. या प्रसंगी शे. का. फेडरेशनचे सरचिटणीस श्री. पी. एन. राजभोज, | गुजरातचे श्री. परमार, महाराष्ट्राचे श्री. गायकवाड, मराठवाड्याचे श्री. बी. एस.

मोरे यांची या सभेत भाषणे झाली.

यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण झाले. ते आपल्या भाषणात

` म्हणाले,

भगिनींनो आणि .बंघुंनो,

` मी-या भागात, भंडारा जिल्हयात निवडणुकीच्या दौऱ्यावर आलो आहे. हा

विभाग निवडणूक विभागांत 'येत नाही. पण काही लोकांनी ५,००० रुपयांची

थैली अर्पण करण्याचे मला आश्‍वासन दिले. पूर्वीच २,००० रुपये दिले व सध्या

१,५०० रुपये अर्पण करतो, असे 'येथील कार्यकर्ते म्हणतात. अशा प्रसंगी

निवडणुकीच्या बाबतीत काही सांगणे अप्रयोजक आहे. परंतु ज्या विषयासंबंधाने

मी बोलणार आहे ते मात्र महत्त्वाचे आहे.

१९५२ साली झालेल्या निवडणुकीत सर्व भागात फेडरेशनचा पराभव झाला;

तेव्हा कॉँग्रेसला फार आनंद झाला. यावेळी काँग्रेसच्या विरूद्ध झगडणारा

फेडरेशन हा एकच पक्ष होता. दुसरे पक्ष आपआपली भूमिका विसरून 'मेले. आम्ही निवडणुकीत हरलो असे पाहून काही लोक मला म्हणत,

आंबेडकरांनी हा पक्ष नाहिसा करावा, खुंटीला टांगून ठेवावा. कारण यात काही

जीव नाही, त्राण नाही. बाहेरच्या लोकांप्रमाणेच आमच्यातीलही काही लोक

असेच म्हणत. पण मला तसे काही वाटत नाही. आता झालेल्या काही

सभातून जे २-३ लाखाचे वर लोक जमले त्यावरून फेडरेशनची आवश्यकता

' स्पष्टपणे प्रतीत झाली. (टाळया) फेडरेशनची आवश्यकता काय आहे हे जाणून

घेण्यासाठी आजच्या परिस्थितीत देशाचा कारभार कसा चालू आहे, ही गोष्ट

लक्षात घेतली पाहिजे. इंग्लंडात जेव्हा एखादा पक्ष अधिकारारूढ होतो तेव्हा

तो सर्व लोकांना समभावाने वागवितो. कॉन्झरवेटीव्ह पक्ष अधिकारावर असला

`तर लायसन्स अथवा ग्रँट देताना व्यक्तीच्या राजकीय पक्षाचा, अधिकारी वर्ग

मुळीच विचार करीत नाही. हीच नीती इतरही देशात आहे. पण ह्या

देशातील राज्यकर्ते इतर पक्षाबद्दल बेपर्वा आहेत. ज्या लोकांनी लहान-मोठ्या

संस्था चालविल्या त्यांना मी सांगितल्याप्रमाणे कटु अनुभव आले

असतील. इंग्रजांच्या राज्यात अधिकारी वर्ग कोणाबद्दलही मनात अढी न

बाळगता न्याय देई पण आज पांढरी टोपी घालणारा कॉग्रेसचा बगळा जिल्हयाचा