- डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे ३९०
परीक्षा पास करण्यासाठीच उपयोग करून चालणार नाही. ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या बांधवांची सुधारणा, प्रगती करण्याकरिता केला पाहिजे. तरच भारत उन्नतावस्थेला जाईल.
जगातील अनेक गुंतागुंतीचे प्रश्न सुटलेले नाहीत. ते सोडविण्याचा मानव सारखा प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच निरनिराळे सिद्धांत पुढे मांडण्यात येतात. कार्लमार्क्स आज आपणापुढे खरा प्रश्न आहे. आजचे प्रश्न सोडविण्यास मार्क्सच्या विचारसरणीऐवजी दुसरी एखादी प्रभावी विचारसरणी उपयोगी पडेल काय ? हाच आजच्या काळाचा प्रश्न आहे. आपले सारे प्रश्न सोडविण्यास कार्लमार्क्सचे सिद्धांत समर्थ ठरतील की नाही हीच आजची समस्या आहे. ही समस्या आजच्या पिढीने शक्य तितक्या लवकर सोडविली
पाहिजे.
या देशात बहुसंख्य लोक अज्ञानात आणि दारिद्र्यात आहेत. वरिष्ठ वर्ग या लोकांची सारखी पिळवणूक करीत आहे. म्हणूनच मी सांगू इच्छितो की, वरिष्ठ वर्गानी वेळीच जागे होऊन बहुसंख्य पददलित लोकांच्या आशाआकांक्षा, भावना विचारात घेतल्या पाहिजेत. त्यांनी वेळीच आपले वर्तन सुधारले नाही तर त्यांचा संपूर्ण निःपात होण्यास फार वेळ लागणार नाही !