३२०
तत्त्व आणि व्यवहाराची सांगड घातली नाही तर
वरिष्ठ वर्गाचा निःपात होण्यास वेळ लागणार नाही
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तारीख २ मे १९५४ रोजी मुंबईच्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये यूथ असेंब्लीचे उद्घाटन केले. |
त्याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे भाषण झाले. ते म्हणाले
मी गेली कित्येक वर्षे विद्यार्थी चळवळीचे निरीक्षण करीत आहे. परंतु केवळ शिक्षणाच्या प्रश्नांकडे किंवा विद्यार्थांच्या अडीअडचणींकडे विद्यार्थ्यांच्या एकाही परिषदेने लक्ष दिलेले मला दिसले नाही. . विद्यार्थ्याच्या निरनिराळ्या संस्था, निरनिराळ्या राजकीय पक्षांच्या चाकाला बांधलेल्या असतात. एवढेच नव्हे, तर काही विद्यार्थी संघटना कम्युनिस्ट राष्ट्रांना तर काही संघटना लोकशाहीवादी राष्ट्रांना पाठिंबा देण्यासाठीच जन्माला आल्या आहेत असे मला वाटते. त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नाकडे लक्ष न देता केवळ वादाच्या नादाने भलतीकडेच त्या वहात
जातात.
स्वातंत्र्य. समता व भ्रातृभाव यांच्या आपण खूप गप्पा मारतो. नव्हे, या त्रयीवर आपण व्याख्यानेही झोडू शकतो. परंतु या तिन्हीपैकी एकतरी आपल्या भारतीय समाजात बसत आहे की नाही याचा विचारही आपण करीत नाही. जणू काही तत्त्वांची आणि व्यवहारांची सांगड घालण्याची आपणावर काहीच जबाबदारी
नसल्याचे वाटते !
भारतामध्ये बहुसंख्य जनता अज्ञान आणि भोळसर खुळ्या कल्पनेत गुरफटून गेली आहे. नव्हे, येथील समाज रचनाच खुळ्या कल्पनांना जन्म देते. म्हणून उपास-तापास, नवस-सायास, देव-देवऋषी करणे म्हणजे धर्मपालन करणे अशी लोकांची भावना झालेली आहे. या खुळ्या आणि धर्ममोळया जनतेची या कल्पनेतून सुटका करावयास पाहिजे. विद्यार्थ्यांनी चाळीचाळीत जाऊन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजूती दूर केल्या पाहिजेत; तरच आपल्या शिक्षणाचा जनतेला काही तरी लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा केवळ
प्रबुद्ध भारत जयंती विशेषांक : १४ एप्रिल १९५६.